अहमदनगरमध्ये प’वॉर’ ! काका-पुतणे फिल्डिंग लावून, आता ‘या’ माजी आमदारावर लावणार ताकद

अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. बारामतीला लागून असल्याने ज्येष्ठ नेते खा. शरद पवारांचे येथे कायम लक्ष. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे. नुसत्या शरद पवारांचंच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही यावेळी नगरवर जास्त लक्ष आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. बारामतीला लागून असल्याने ज्येष्ठ नेते खा. शरद पवारांचे येथे कायम लक्ष. पण यावेळी परिस्थिती जरा वेगळी आहे.

नुसत्या शरद पवारांचंच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचंही यावेळी नगरवर जास्त लक्ष आहे. शरद पवार झाले की अजित पवार आणि अजित पवार झाले की शरद पवार असे गेल्या वर्षभरापासून एकापाठोपाठ एक या दोन्ही नेत्यांचे नगर दौरे सुरु आहेत.

आता दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर आलेहोते. त्यांनी श्रीगोंदेत जात नागवडेंसाठी फिल्डिंग लावली असे बोलले जात आहे. दरम्यान आता पुतण्यामागे लगेचच शरद पवार श्रीगोंदेत जातायेत.

महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार राहुल जगताप यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात विजय संकल्प मेळावा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. श्रीगोंदेमध्ये शरद पवारांच्या पुरोगामी विचाराची पकड दिसून येते.

महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी जोरदार तयारी सुरू केली. त्यामुळे पाचपुतेही अलर्ट झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांना श्रीगोंद्यातून मोठी

आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीच्या गोटातून माजी आमदार राहुल जगताप, सेनेचे साजन पाचपुते, काँग्रेसचे घनश्याम शेलार यांनी लंगोट लावण्यास सुरुवात केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

त्यामुळे शरद पवार हे या मतदारसंघात आपला उमेदवार बसविण्याचे मनसुबे आखत आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांचे नाव लावून धरण्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पुढील महिन्यात विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शरद पवार हे राहुल जगताप यांची उमेदवारी जाहीर करून कोंडी फोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दोन्ही पवारांचे लक्ष
सध्या अहमदनगर जिल्ह्यात दोन्ही पवारांचे लक्ष असून पवारांमध्येच अहमदनगर साठी राजकीय वॉर अर्थात राजकीय संघर्ष सुरु असल्याचे दिसते. त्यातून आता श्रीगोंदेत अजित दादांच्या नागावंडेंविरोधात पवार साहेब माजी आ. राहुल जगतापांवर डाव लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe