Ahmednagar Politics : भाजपाचे माजी खा.डॉ.सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत त्याच्या चौकशीची केलेली मागणी चुकीची आहे. विजयी झाल्यानंतर विजयाचा आनंद पचविता आला पाहिजे, आणि पराभवही पचविता आला पाहिजे.
परंतु त्यांना त्यांचा पराभवच मान्य नाही, कारण पराभव मान्य न करणे ही विखे कुटूंबाची ही परंपरा असल्याची टीका महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांनी विखे यांच्यावर केली.

भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी ईव्हीएम मशिन तसेच व्हिव्हिपॅटवर संशय घेत निवडणूक आयोगाकडे त्याच्या चौकशीची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी विखे यांनी विखे कुटूंबावर चांगलीच टीका केली आहे.
ते म्हणाले की,विखे कुटूंबाची ही राजकीय परंपरा आहे. डॉ.विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे हे यशवंतराव गडाख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यावेळीही निवडणूक आयोगाकडे जाऊन, तत्कालीन निवडणूक आयुक्त टी. एन. शेषण यांनी भेट घेऊन त्यांनी आक्षेप नोंदविला होता.
माझ्या राजकीय जीवनात मी अनेक निवडणूका पाहिल्या. जिल्हा, राज्य व केंद्र स्तरीय निवडणूका मी हाताळल्या असून त्या पारदर्शीपणे पार पडल्याचा माझा अनुभव आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राज्यात सर्वात उशिरा या मतदारसंघाचा निकाल जाहिर झाला.
प्रत्येक गोष्ट चार चार वेळा प्रत्येक अधिकाऱ्याने नजरेखालून घातली. चार चार वेळा प्रत्येक आकडे तपासण्यात आले प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच-पाच व्हिव्हिपॅट मशिन मधील चिठ्या मोजण्यात आल्या. त्यात कोठेही फरक आढळून आलेला नाही.
त्यामुळे भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलेली मागणी चुकीची असल्याचे लंके म्हणाले. तसेच राजकीय पराभव मान्य न करणे ही विखे कुटूंबाची ही राजकीय परंपरा आहे असल्याचे सांगत.
डॉ.विखे यांचे आजोबा स्व. बाळासाहेब विखे हे यशवंतराव गडाख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यावेळीही निवडणूक आयोगाकडे जाऊन, तत्कालीन निवडणूक आयुक्त टी एन शेषण यांनी भेट घेऊन त्यांनी आक्षेप नोंदविला होता याची आठवण खा.लंके यांनी करून दिली.