‘विखे कुणाचेच नाहीत, त्यांना त्यांच्याच पक्षावर विश्वास नाही’ , मॉकपोल वरून मोठा गौप्यस्फोट

हमदनगर लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत खा.लंके विजयी झाले पण निकालानंतर लगेचच माजी खा. विखे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी केली. त्यानुसार आता ४० केंद्रावरील मशीनची मॉकपोल टेस्ट होणार असल्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

Ahmednagarlive24 office
Published:
sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीत खा.लंके विजयी झाले पण निकालानंतर लगेचच माजी खा. विखे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी केली. त्यानुसार आता ४० केंद्रावरील मशीनची मॉकपोल टेस्ट होणार असल्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना खा. निलेश लंके म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्वास दाखवत असाल, तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत.

त्यांच्या आजोबांनीही तेच केले, अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी फेरमतमोजणीच्या मागणीवर त्यांचे नाव न घेता दिली. अहमदनगर मतदार संघातील काही मतदान केंद्रांवरील मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केल्यानंतर

आता मॉक पोल घेण्यात
येणार असल्याबाबत पत्रकारांशी बोलताना खासदार लंके यांनी हंगे येथे आज बोलताना दिली. ते म्हणाले की, मॉक पोल घेतला, तरी माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे.

या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या, तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेज केले असते, असा टोलाही लंके यांनी लगावला. एकाही मतदान केंद्रावर गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते.

मॉक पोल घेतला जातो. त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. मग त्यावर चर्चा कशाला, असा सवाल लंके यांनी केला.

निवडणुकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी प्रतिक्रियाही खा. नीलेश लंके यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe