Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचे सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र, कारणही आलं समोर…

Published on -

Arvind Kejriwal : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगर भाजपा आणि काँग्रेसच्या सरकार बनवण्यासाठी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रयत्नशील आहेत. अरविंद केजरीवाल यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. केजरीवालांच्या पत्रामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना त्यांनी पाठवलेल्या पत्रावर काही मुख्यमंत्र्यांनी उत्सुकता दाखवली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी केलेल्या आगामी रणनीतीबाबत इतर पक्षांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पी विजयन, तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना पत्र लिहित स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. यामुळे केजरीवाल यांच्या मनात नेमकं आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

असे असताना तेलंगणाचा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी आरोग्याचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला आहे. केसीआर सध्या आपला पक्ष भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) अन्य राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

यामुळे आता येणाऱ्या काळात काही वेगळे गणित दिसणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या काँग्रेसला बाजूला करून तिसरी आघाडी केली जाणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe