Bachu Kadu : ५० खोके एकदम ओके! बच्चू कडूंना होम ग्राउंडवर मोठा धक्का! बाजार समितीत पॅनेलचा पराभव…

Published on -

Bachu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. खरेदी विक्री संस्थेच्या निवडणूकीत त्यांच्या पॅनलचा पराभव पत्करावा लागला आहे. येथील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार निवडून आल्याने बच्चू कडूंसाठी हा मोठा धक्का बसला आहे. यामुळे आगामी निवडणूक त्यांना जड जाण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करताना ‘५० खोके एकदम ओके’ अशी नारे बाजी केली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अटीतटीच्या लढत पाहायला मिळाली. चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या १५ संचालकपदासाठी १९ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत शेतकरी पॅनल आणि सहकार यांच्यात चुरशीच्या लढत झाली. बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे १२ संचालक विजयी झाले. तर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी पॅनलचे फक्त तीन संचालक निवडून आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून, आर. व्ही. भुयार यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला. सहायक निबंधक एस. टी. केदार यांच्या नेतृत्त्वात सहकार विभागाच्या एकूण ३१ कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली. तेव्हा पासून धाकधूक वाढली होती.

मतमोजणी च्या दिवशी पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बहुतांश ठिकाणी सहकार व शेतकरी पॅनलमध्ये जयपराजयासाठी अवध्या एका मताचा फरक पाहायला मिळाला. यामुळे तणाव देखील होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe