Girish Bapat : नेता सोडून गेला पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यालय सुरूच ठेवले…

Published on -

Girish Bapat : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. यामुळे पुणेकरांना मोठा धक्का बसला. बापट आणि पुणेकरांचे एक वेगळेच नाते होते. बापट यांनी अनेक पदावर काम केले होते. असे असताना त्यांचे निधन झाल्यानंतर चोवीस तासांतच त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले.

भाजपचे सहप्रचार प्रसिद्धीप्रमुख पुष्कर तुळजापूरकर म्हणाले, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी खासदार गिरीश बापट तत्परतेने कार्यरत होते. त्यामुळे बापट यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. या पुढेही हे कार्यालय सुरू राहणार आहे. यामुळे लोकांची कामे थांबणार नाहीत.

बापट यांनी पुणे महापालिकेत नगरसेवक पदापासून सुरुवात करून पुण्याचे खासदार होण्यापर्यंतचा प्रवास केला. पाचवेळा आमदार झालेल्या बापट यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदासह विविध मंत्रीपदेही भुषवली होती. पुणे जिल्ह्यात पक्षासाठी त्यांनी काम केलं.

सर्वसामान्यांमध्ये राहणारे नेते म्हणून बापट सुपरिचित होते. बापट यांच्या निधनानंतर लगेचच चोवीस तासांत त्यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले. आता याठिकाणी पोट निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लागले आहे.

यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत. तसेच त्यांच्या घरातील उमेदवार असेल तर ही निवडणूक बिनविरोध देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे आता पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe