Imtiaz Jalil : सध्या संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद जोरदार पेटला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, इम्तियाज जलील ही औरंगजेबाची औलाद आहे. इम्तियाज जलील हैदराबादचा, तिकडे काय झालं कुणी पाहिलं. आमच्या छातीवर नाचाल तर तुम्हाला दाखवून देऊ, असा इशारा शिवराळ भाषा वापरत संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे.
यामुळे आता जलील काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिरसाट म्हणाले, नाव बदलला म्हणून आम्ही आनंद व्यक्त केला. निजामाने प्रत्येकाला उर्दू शिकावे असे सांगितले. आम्ही शिकलो, विरोध केला नाही.
आता राज्य आमचं आहे. आता आम्ही जे म्हणणार तेच होणार. आता तुम्ही आमच्या तावडीत आलात. काही लोकांना पोटशूळ उठलं, असे म्हणत संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.
ते म्हणाले, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या नामांतराविरोधात येथील खासदार आंदोलन करत असताना आता नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे.