महाराष्ट्रातील ‘या’ गावात 2-3 तासात एकही मतदान झाले नाही ! कारण काय ?

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रातील मतदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत असून या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढू शकते असा दावा जानकारांनी केला आहे. आज सकाळपासूनच मतदानासाठी राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकीची चर्चा होती त्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात विक्रमी मतदान झाले.

लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रातील मतदारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसत असून या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढू शकते असा दावा जानकारांनी केला आहे.

आज सकाळपासूनच मतदानासाठी राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिक सर्व कामे बाजूला सारून आपल्या मतदानाचा अधिकार बजावताना दिसत आहेत.

खेड्यापाड्यात शेतीची कामे सुरू असताना देखील शेतकऱ्यांनी मतदान प्रक्रियेला उदंड प्रतिसाद दाखवलाय. मतदारांकडून मतदान प्रक्रियेला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे.

मतदान हा भारतासारख्या लोकशाही देशातला एक मोठा उत्सव. मतदानाच्या दिवशी मतदार आपल्या राज्याचे देशाचे नेतृत्व कोणत्या माणसांकडे असावे हे ठरवतात.

कोणता माणूस विकासाची कामे करणार? आपल्या भागातील प्रलंबित कामे कोण मार्गी लावणार? ही गोष्ट ओळखून मतदार राजा मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावतात. यानुसार आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदारांकडून मतदान केले जात आहे.

मात्र महाराष्ट्रातील एका गावात सकाळपासून मतदानाची प्रक्रिया बंद आहे. या गावातील एकाही नागरिकाने अजून पर्यंत मतदान केलेले नाही. त्यामुळे हा विषय सध्या राज्यात चर्चेचा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातील नागरीकांनी अजूनपर्यंत मतदान केलेले नाही.

येथील मतदारांनी थेट निवडणुकीकडेच पाठ फिरवली आहे. पण यामागे नेमके कारण काय आहे? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.

आता दहा वाजून वीस मिनिटांचा वेळ झाला आहे. पण अजूनपर्यंत एकही ग्रामस्थ मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेला नाही. आतापर्यंत 3 तास उलटले आहेत आणि एकही ग्रामस्थ मतदानासाठी आला नाही.

त्यामुळे मतदान केंद्रावर शुकशुकाट आहे. याबाबत गावकऱ्यांशी संवाद साधला असता गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe