आमदार आशुतोष काळे अपेक्षित काम करतांना दिसत नाहीत, त्यामुळे अन्यायाच्या विरोधात कुठेही मागे हटणार नाही- विवेक कोल्हे

कोपरगावात विवेक कोल्हेंनी आमदार आशुतोष काळेंवर अप्रत्यक्ष टीका केली. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण मागे हटणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विकासाच्या अपूर्णतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

Published on -

Ahilyanagar Politics- कोपरगाव- पक्षहितासाठी आपण गत निवडणूकीत भूमिका घेतली, पण दुर्दैवाने जे यश आपण लोकप्रतिनिधींच्या पदरात टाकले, त्याप्रमाणे अपेक्षित काम होताना दिसत नाही. हे वास्तव असल्याची टीका युवा नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता केली आहे.

अन्यायाच्या विरोधात मागे हटणार नाही

तालुक्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात कोलो बोलत होते. कोल्हे महणाले, गेली अनेक वर्षे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचाराने काम करत आहोत. अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारे म्हणून आपली ओळख आहे. मतदारसंघात विकासकामे आणि समस्यांच्या सोडवणुकीबाबत होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आपण कुठेही मागे हटणार नाही.

योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणे हे उद्दिष्ट

याउलट शासनाला ते प्रश्न निदर्शनास आणून देऊन जनतेला न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, अशी भूमिका विपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यासह आम्हा सर्वांची आहे. पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लोकहिताच्या असणाऱ्या योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी विवेक कोल्हे यांनी पश्चिम मंडळात तालुकाध्यक्ष सुनील कदम यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती

या कार्यक्रमाला शरद नाना थोरात, कोल्हे कारखान्याचे व्हा. चेअरमन राजेंद्र कोळपे, बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम, औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष केशवराव भवर, माजी सभापती पं. स. मच्छिद्र केकाण, विलासराव वाबळे, सोपानराव पानगव्हाणे, ज्ञानेश्वर होन, कैलास माळी, रमेश घोडेराव, संभाजीराव गावंड, रघुनाथ फटंगारे व फकिरराव बोरणारे, दिपकराव चौधरी, दगुराव चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल गवळी, माजी सरपंच बाळासाहेब पाणगव्हाने, माजी सभापती सुनीलराव देवकर, माजी तालुकाध्यक्ष युवा मोर्चा विक्रम पाचोरे, राजेंद्र गवळी, डी. पी. मोरे, निवृत्ती बनकर, शिवाजीराव जाधव, संदिपराव देवकर, शिवाजीराव कदम, विजयराव कदम, किरण कोळपे, बापूसाहेब पवार, शब्बीर पटेल, पुंजाजी राऊत आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News