अहिल्यानगर : तुम्ही सर्वांनी हिंदुत्व स्वीकारले याचा आनंद आहे. विधानसभेतील माझा विजय हा फक्त हिंदुत्वामुळे झाला असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. नगर तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
पुढेते म्हणाले की, १९९५ मध्ये नगर – नेवासा मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यामध्ये इमामपूर गावचे मोठे योगदान माझ्या पाठीशी उभे राहिले होते. जेऊर गट हा घरातील असल्याने इमामपूर गावातील खुंटलेला विकास याची खंत वाटत होती.

मागील गोष्टी विसरून आता फक्त विकास कामांवरच चर्चा करायची. मनात कोणतीही शंका न आणता तुम्ही विरोधात काम केले असले तरी जुने मित्र, कार्यकर्ते आता माझ्याकडे आले त्याचा मला आनंद आहे. माझा दरवाजा तुमच्यासाठी सदैव खुला आहे.
गावचा विकास ही भावना मनात ठेवून पंधरा वर्षाचा बॅकलॉग भरून काढणार आहे. चाळीस लाख रुपयाचा रस्ता दिला तसेच ५० लाख रुपये महादेव रस्त्यासाठी मंजूर असून लवकरच तो रस्ता ही पूर्ण होणार आहे. पंधरा दिवसात स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणार त्यासाठी फक्त ग्रामपंचायतच्या नावाने जागा बक्षीसपत्र करून घ्या. विजेच्या प्रश्नासाठी पांढरीपुल एमआयडीसीतून जेऊर सब स्टेशनला विज जोडण्यात आली आहे.
इमामपूर मधील सर्व नवीन रोहित्र मंजूर करणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बु-हाणनगर पाणी योजनेतून दीड महिन्यात मार्गी लावणार आहे, असेही कर्डिले यांनी सांगितले. तुम्ही सर्वांनी हिंदुत्व स्वीकारले याचा आनंद झाला. इमामपूर गाव भगवेमय दिसून येत आहे.
तुम्ही सर्वांनी हिंदुत्व स्वीकारले याचा आनंद झाला. इमामपूर गाव भगवेमय दिसून येत आहे. येथून पुढे राजकारण करत असताना हिंदुत्व म्हणूनच निवडणूका लढवाव्या लागणार आहेत. हिंदू म्हणून आपापसातील मतभेद, गट तट विसरून एकत्र येण्याची गरज आहे. माझा विधानसभेतील विजय हा केवळ हिंदू म्हणूनच झाला आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदू म्हणून संघटित राहण्याचे आवाहन आमदार कर्डिले यांनी केले.
मच्या सोबत राहून आमच्याच विरोधात काम !
इमामपूर गावातील काही नागरिक उघडपणे माझ्या विरोधात काम करत होते. त्यांचा मला अभिमानच आहे. ते आता माझ्याकडे आले त्याचाही आनंद आहे. तुम्ही तर सरळ विरोधात काम करत होता परंतु काही जण आमच्या सोबत राहून आमच्याबरोबर फिरतात आणि विरोधात काम करतात असे कर्डिले यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर कर्डिले यांच्या समर्थकांमध्ये यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. कर्डिले यांचा टोला कुणासाठी होता याबाबत तर्क वितर्क लावले जात होते.
आ. शिवाजी कर्डिले विकास कामांचे महामेरू म्हणून ओळखले जातात. निवडणुकीनंतर कोणताही दुजाभाव न करता येणाऱ्या सर्वांचे प्रश्नांचे निराकरण कर्डिले करत असतात. मतदार संघातील प्रत्येक गावात कर्डिले यांचे बारीक लक्ष असून त्यांच्या माध्यमातून मतदार संघाचा कायापालट होणार आहे. कर्डिले यांची हिंदुत्वाची भूमिका तरुणांना आकर्षित करत आहे.