Rahul Gandhi : ब्रेकिंग! राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा मोठा निर्णय…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मानहानीच्या खटल्यात सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यो होता है. असे वक्तव्य केले होते. यामुळे हे आता त्यांच्या अंगलट आले आहे.

या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का असतं?” ललित, नीरव आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाचं वक्तव्य 2019 च्या लोकसभा प्रचारात कर्नाटकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले होते.

याबाबत गुजरात भाजपा आ. पूर्नेश मोदींनी दाखल केलेली याचिका दाखल केली होती. याप्रकरणी सुरत न्यायालयात केस सुरू होती. त्यावर निर्णय आला असून सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

दरम्यान, राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याचा मोदी सरकारचा हा डाव आहे, या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभर जेलभर आंदोलन करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना सांगितले. यामुळे वातावरण तापले आहे.

यामुळे पुन्हा एकदा भाजप- काँग्रेस नेते एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. याबाबत राहुल गांधी यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe