Raj Thackeray : राज ठाकरे यांची मुंबईत सभा मात्र पुण्याचे चित्र बदलणार, मनसे नेत्यांनी आखली ‘अशी’ रणनीती…

Ahmednagarlive24 office
Published:

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे. यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मनसैनिक उपस्थित राहणार आहेत.

असे असताना या सभेची पुण्यातच जास्त चर्चा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून मनसेचे 20 हजार कार्यकर्ते मुंबईसाठी जाणार आहे, असे मनसे नेते बाबू वागस्कर आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले. यामुळे पुण्यातील वातावरण ढवळून निघणार आहे.

मनपा निवडणुकीच्या तोंडावर ही सभा होत आहे. संपूर्ण पुणे शहरातील वातावरण राज ठाकरेमय झाले आहे. त्यामुळे या सभेनंतर राज्याला नवी दिशा मिळणार आहे आणि पुणे शहराचे चित्र बदलणार असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले. यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची पुण्यात देखील जोरदार तयारी सुरु आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर पुणे शहरातील चित्र बदलणार असल्याचा दावा मनसे नेत्यांकडून करण्यात आले आहे.

यामुळे आगामी निवडणुकीत काय बदल दिसणार का? हे लवकरच समजेल. आजच्या सभेसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून 160 बसेस आणि दीड हजार चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सभेसाठी जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe