‘बबनरावं अन राहुलदादा माझ्यामुळे आमदार झालेत, आता तुम्ही दोघांनी मला मदत करून आमदार करावे…’ राजेंद्र नागवडे यांचा दावा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी आणि वाळकी या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो. हा विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा कार्यक्षेत्रात येतो. येथून 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बबनराव भिकाजी पाचपुते आमदार झाले होते. 2014 साली राहुल कुंडलिकराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार झालेत. नंतर 2019 मध्ये बबनराव भिकाजी पाचपुते हे भाजपाच्या तिकिटावर आमदार झालेत.

Tejas B Shelar
Published:
Rajendra Nagwade

Rajendra Nagwade : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे. महायुती तथा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात श्रीगोंदा तालुका आणि अहमदनगर तालुक्यातील चिंचोडी आणि वाळकी या दोन महसूल मंडळाचा समावेश होतो.

हा विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा कार्यक्षेत्रात येतो. येथून 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बबनराव भिकाजी पाचपुते आमदार झाले होते. 2014 साली राहुल कुंडलिकराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार झालेत.

नंतर 2019 मध्ये बबनराव भिकाजी पाचपुते हे भाजपाच्या तिकिटावर आमदार झालेत. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यंदाच्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महाराष्ट्रातील दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.

या फुटी नंतर लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे विधानसभेच्या निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष असून जागा वाटपावरून महायुती मधील घटक पक्षांमध्ये नक्कीच रस्सीखेच होणार आहे. यामुळे येथून कोण उभे राहणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

महायुतीचा येथील उमेदवार अजून निश्चित झालेला नाही मात्र इच्छुकांची संख्या वाढत आहे. अशातच, श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांचे एक विधान चर्चेत आले आहे. तालुक्यातील म्हातारपिंप्री येथे झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप आणि विद्यमान आमदार बबनराव पाचपुते उपस्थित होते.

यावेळी, या तिन्ही नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान ग्रामस्थांच्या माध्यमातून यावेळी गावाला सभा मंडप मिळायला हवा अशी मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना माजी आमदार राहुल जगताप यांनी माझ्या हातात सत्ता नाही मात्र मी खासदार निलेश लंके यांच्याकडून सभामंडपासाठी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देईन असे आश्वासन दिले.

यानंतर राजेंद्र नागवडे यांनी माईक हातात घेतला. नागवडे म्हणालेत की या दोघांनाही मीच आमदार केल आहे. 2014 मध्ये राहुल दादा आणि गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांचे काम केले आहे त्यांना आमदार केले आहे.

यामुळे आता उपकाराची परतफेड करावी लागणार आहे नाहीतर देव माफ करत नाही. या दोघांनी मला मदत करून यावेळी आमदार करावे असे आवाहन नागवडे यांनी यावेळी केले. या दोघांनी मदत केली तर दहा लाख काय 50 लाख रुपयांचा निधी देईन असेही नागवडे यांनी सांगितले. यानंतर विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना आपण या गावाला नेहमीच मदत केली आहे. या अलीकडील काही वर्षात गावाला 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

उपकार फिटले आहेत

माजी आमदार राहुल जगताप यांनी राजेंद्र नागवडे यांचे उपकार आधीच फिटले असल्याचे म्हटले आहे. जगताप सांगतात की 2009 मध्ये नागवडे भाजपाच्या तिकिटावर विधानसभा लढवत होते. त्यावेळी या जागेवरून माझे वडील यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. पण नागवडे यांना उमेदवारी मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आम्ही त्यावेळी नागवडे यांना मते दिली आहेत. हेच कारण होते की 2014 मध्ये नागवडे यांना आमचे काम करावे लागले. अशा तऱ्हेने हा हिशोब आधीच चुकता झाला असल्याच जगताप यांनी क्लिअर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe