Sangamner News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून संगमनेरचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात संगमनेर हा राज्यातील एक आदर्श तालुका म्हणून नावारूपाला आला आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत.
ते आगामी विधानसभा निवडणुकीतही संगमनेर मधून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्याला जवळपास नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील विविध गावांमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास कामासाठी ८ कोटी ८५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नक्कीच या कोट्यावधी रुपयांचा निधीमुळे तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास कामांना गती मिळणार आहे. जयश्री थोरात यांनी, ‘आमदार बाळासाहेब थोरात यांनी संपूर्ण संगमनेर तालुका आपला परिवार मानला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्यात. नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिलाय. ग्रामीण विकास,सहकार आणि सातत्याने विकास कामे यामुळे आपला तालुका हा मॉडेल ठरला आहे.
संगमनेर तालुका महाराष्ट्रातील आदर्श तालुक्यांमध्ये गणला जातो अन या कामी आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रयत्न विशेष खास ठरले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास व्हावा यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केलाय.
दरम्यान आमदार थोरात यांच्या याच पाठपुराव्यामुळे शासनाकडून तालुक्यातील या मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांच्या वस्तींच्या विकासासाठी आठ कोटी ८५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झालाय, अशी माहिती जयश्री थोरात यांनी यावेळी दिली.