Satyajit Tambe : उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी! सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत..

Published on -

Satyajit Tambe : आमदार सत्यजित तांबे यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी थेट कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटला अनेक अंगाने बघितले जात आहे. तांबे नुकतेच अपक्ष निवडणूक येऊन आमदार झाले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी अशा आशयाचे ट्विट केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्यजित तांबे यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ठ केली नाही. नाशिक पदवीधर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचे कौतुक करत घरवापसी करण्यावर बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले होते. मात्र यावर अजून त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक राज्यात चर्चेत राहिली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने थोरात आणि तांबे कुटुंब चर्चेचा विषय ठरले होते. यामुळे काँग्रेसमध्ये मोठा अंतर्गत वाद निर्माण झाला होता.

याशिवाय कॉंग्रेसकडून यावेळी जोरदार टीका करण्यात आली होती. बाळासाहेब थोरात यांनी या नंतर सत्यजित तांबे यांची संपूर्ण टीम कॉंग्रेसमध्ये आहे. तो एकटा पडला आहे. त्यामुळे कुणालाही करमनार नाही. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये सत्यजित ने परत यावे असे सांगितले होत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe