महायुतीमधला आमदार ठाकरे गटाच्या शंकरराव गडाख यांच्या कामावर खुश ! अजितदादांचा ‘हा’ विश्वासू आमदार म्हणतो गडाख पुन्हा मंत्री होतील

शंकरराव गडाख पुन्हा एकदा मंत्री होतील, नेवासा आणि नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा सुवर्णकाळ येईल". नेवासे तालुक्यात टेलपर्यंत पाणी आणण्याची धमक फक्त शंकरराव गडाख यांच्यातच आहे, असेही मत घुले यांनी यावेळी व्यक्त केले आहे. घुले यांच्या या वक्तव्यामुळे गडाख आणि घुले आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Tejas B Shelar
Published:
Shankarrao Gadakh

Shankarrao Gadakh : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला अन महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आहे. महाविकास आघाडीच्या खासदारकीच्या जागा यावेळी वाढल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स खूपच वाढला आहे.

दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवातून धडा घेत विधानसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये सध्या जागा वाटपावर मंथन सुरू आहे. दोन्ही गटांमध्ये जागा वाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

पण, याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अशातच, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. या विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण की महायुती मधील काही नेते आता युतीची साथ सोडणार असे दिसत आहे.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अजित दादा यांच्या गटातील दोन माजी आमदार दादांची साथ सोडणार असे संकेत मिळू लागले आहेत. यामुळे सहाजिकच महायुतीला मोठा फटका बसणार आहे. घुले बंधू हे या मतदारसंघातील माजी आमदार आहेत. सध्या ते अजितदादा यांच्या गटात आहेत.

मात्र ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. खरे तर महायुतीत ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार आहे. कारण की येथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. यामुळे घुले बंधूंना महायुतीमधून तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे त्यांनी आता वेगळा मार्ग चोखंदळायला सुरुवात केली आहे.

यात त्यांना कितपत यश मिळतं हे पाहण्यासारखं ठरणार आहे. अशातच मात्र माजी आमदार नरेंद्र घुले यांनी उबाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेवासाचे आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर अक्षरशः कौतुकांचा वर्षाव केला आहे.

नरेंद्र घुले यांनी असे म्हटले आहे की, “मी, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं आहे. पण, आम्हा तिघांना कधीही राज्यमंत्रिपद मिळालं नाही. परंतु शंकरराव गडाख थेट कॅबिनेट मंत्री झालं. याचा आम्हाला आनंद असून, जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

शंकरराव गडाख पुन्हा एकदा मंत्री होतील, नेवासा आणि नगर जिल्ह्याला पुन्हा एकदा सुवर्णकाळ येईल”. नेवासे तालुक्यात टेलपर्यंत पाणी आणण्याची धमक फक्त शंकरराव गडाख यांच्यातच आहे, असेही मत घुले यांनी यावेळी व्यक्त केले आहे. घुले यांच्या या वक्तव्यामुळे गडाख आणि घुले आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र दिसणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

यामुळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ समवेतच नेवासा विधानसभा मतदारसंघात देखील वेगवेगळे समीकरणे डेव्हलप होण्याची शक्यता आहे. घुले बंधू हे आगामी निवडणूक लढवणार आहेत. भारतीय जनता पक्ष यावेळी विद्यमान आमदारांना तिकीट देण्याची शक्यता आहे.

मात्र असे असले तरी घुले यांच्या या वक्तव्यामुळे प्रतापराव ढाकणे तसेच विद्यमान आमदार मोनिका राजळे या अलर्ट मोडवर आल्या आहेत. खरे तर गडाख आणि घुले यांचं नातंगोत आहे. पण, असे असले तरी घुले यांच्या या वक्तव्यानंतर आणि भूमिके नंतर सर्वजण सावध झाले आहेत.

घुले यांना महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची शक्यता नाहीये मात्र ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास गडाख यांचा त्यांना पाठिंबा राहणार आहे. यामुळे प्रतापराव ढाकणे समवेत सर्वजण आता अलर्ट मोडवर आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe