Sheetal Mhatre : काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात शिवसैनिकांना अटक करण्यात आलेली. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या सातही जणांना आज अखेर जामीन मिळाला आहे.
त्यामुळे त्यांची जेलमधून मुक्तता होणार आहे. या सातही जणांचा कोर्टाकडून जामीन मंजूर झाला. त्यामुळे त्यांची जेलमधून सुटका होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. याबाबत अनेक वक्तव्य केली जात होती.
साईनाथ दुर्गे हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता बोरिवली न्यायालयाने साईनाथ दुर्गे यांच्यासह इतर सहा आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, त्यांना दर सोमवारी दहिसर पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. तसेच सोशल मीडिया वापरायचे नाही. मुंबई बाहेर जायचं नाही, अशा अटींवर आरोपींना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अटी कोर्टाने सांगितल्या आहेत.
याप्रकरणी ज्येष्ठ वकील राजेश मोरे, ज्येष्ठ वकील अनिल पार्टे यांना वकील प्राची पार्टे, वकील मेराज शेख यांनी युक्तिवाद केला. याबाबत साईनाथ आमचा वाघ आहे. तो अन्यायाच्या विरुद्ध लढतोय. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड चालू आहे.
तरुणांचे खोटे आरोपांवरुन आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चालू आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादरच्या घरी जावून कुटुंबियांची भेट घेतलेली, या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती.