Shevgaon Politics News : काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. आता येत्या 23 तारखेला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे या निवडणुकीत नेमके काय होणार, कोणते नेते पडणार आणि कोणते विजयी होणार, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुती सत्ता काबीज करणार? असे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
सोबतच आता वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून एक्झिट पोल देखील समोर येत आहेत. यातील काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत दाखवण्यात आले आहे तर काही एक्झिट पोल मध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात स्थापित होणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र हा केवळ अंदाज असून खरे चित्र हे 23 तारखेलाच क्लियर होणार आहे. तत्पूर्वी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार कोण राहू शकतो याबाबतही मोठा अंदाज समोर येत आहे. सकाळच्या एक्झिट पोल नुसार शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून यावेळी पुन्हा एकदा विद्यमान आमदार बाजी मारू शकतात.
शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोनिकाताई राजळे 2014 आणि 2019 मध्ये विजयी झाल्या आहेत आणि त्या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले हे उभे आहेत. म्हणजेच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची लढत ही तिरंगी बनलेली आहे.
मात्र लढत तिरंगी असतानाही पुन्हा एकदा विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे हेच पुन्हा एकदा विजय होतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. शरद पवार गटाचे प्रतापराव ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली होती.
मात्र आमदार मोनिकाताई राजळे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसतील असा काहीसा अंदाज या एक्झिट पोल मधून समोर येतोय.
एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर मोनिका राजळे हे सलग तिसऱ्यांदा या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील. यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे हॅट्रिक करणार की येथे एक्झिट पोलचा अंदाज फेल ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.