अखेर महायुतीने श्रीगोंद्याचा उमेदवार ठरवला, अजितदादा गटातील नागवडेंचा पत्ता झाला कट; ‘या’ फॉर्म्युल्यामुळे पाचपुते यांनाचं तिकीट

पाचपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भाजपाने एक अंतर्गत सर्वे सुरू केला आहे. या सर्वे मध्ये ज्या उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता सर्वात जास्त आहे त्याला तिकीट दिले जाणार आहे. यानुसार विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची जिंकून येण्याची क्षमता ही इतरांपेक्षा जास्त असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सर्वे मधून समोर आले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024

Shrigonda Vidhansabha Nivadnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. दोन्ही गटांकडून या ठिकाणी मोर्चे बांधणी सुरू आहे.

अशातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीने श्रीगोंदा चा उमेदवार हा फायनल केला आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीची जागा वाटप संदर्भात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीत 2019 मध्ये ज्या पक्षाचा आमदार निवडून आला आहे त्याच पक्षाला ती जागा देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. म्हणजेच महायुतीने सीटिंग-गेटिंग हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

खरे तर या जागेवरून अजितदादा गटातील अनुराधा नागवडे या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जाणार असून नागवडे यांचा आता या जागेवरून पत्ता कट झाला असल्याच्या चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्ष विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याच खांद्यावर श्रीगोंद्याचा गड राखण्याची जबाबदारी सोपवणार आहेत. पाचपुते किंवा त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीला भारतीय जनता पक्ष तिकीट देणार असे म्हटले जात आहे.

पाचपुते यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भाजपाने एक अंतर्गत सर्वे सुरू केला आहे. या सर्वे मध्ये ज्या उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता सर्वात जास्त आहे त्याला तिकीट दिले जाणार आहे.

यानुसार विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची जिंकून येण्याची क्षमता ही इतरांपेक्षा जास्त असल्याचे भाजपाच्या अंतर्गत सर्वे मधून समोर आले आहेत. यामुळे भारतीय जनता पक्ष पाचपुते यांनाच उमेदवारी देणार असा दावा होत आहे.

महायुतीकडून ही जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला जाणार आणि येथून पुन्हा एकदा पाचपुते यांना उमेदवारी मिळणार असे चित्र तयार झाले आहे. अशा परिस्थितीत सध्या महायुतीमध्ये असणाऱ्या आणि श्रीगोंद्याचा गड लढवू इच्छिणाऱ्या अजितदादा गटातील अनुराधा नागवडे काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

खरेतर त्यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. यामुळे ते इतर पक्षांसमवेत संधान साधणार की एकला चलो रे चा नारा देत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या ठरणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe