Supriya Sule : सध्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
असे असताना आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सुप्रिया सुळे मागच्या काही वर्षांपासून शाकाहारी झाल्या आहेत. त्या मांसाहाराचे सेवन करत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगितले आहे.

दरम्यान, मटण थाळीचा एक व्हिडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केले.
आधी महादेव मंदिरात आणि सासवडला सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले, असे शिवतारे म्हणाले होते. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली असून सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.
आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले, असे विजय शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.