Udayanraje : खासदारांचे पेंटिंग हा बालिशपणाचा कळस, समर्थकांना आवर घाला

Published on -

Udayanraje : सध्या राज्यसभेचे खासदार उदयनराजेंच्या पेंटिंगवरुन सध्या सातारा शहरात तणावाचे वातावरण आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. पालकमंत्री देसाई व उदयनराजे समर्थक यांनी हा विषय मिटवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याची बरीच चर्चा झाली.

असे असताना आता या मुद्द्यावरुन भाजपचे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे. हा तर बालिशपणाचा कळस असे म्हणत या विषयाची खिल्ली उडवली आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खासदारांच्या पेंटिंगचा वाद महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादापेक्षा आणि काश्मिरच्या वादापेक्षाही गहण आहे. मुळात खासदारांचे पेंटिंग कुठे काढायचे याबाबत राज्यसभा निर्णय देईल, हा सर्व बालिशपणाचा कळस आहे.

दरम्यान, यातून काय साध्य होणार आहे. आता खासदार उदयनराजेंचे चित्र कोठे काढायचे याची चर्चा राज्यसभेत होणार आहे. इतका हा मोठा विषय झालेला आहे. नेताच रात्रीअपरात्री चित्र कुठे काढायची हे बघत फिरत असेल आणि तेथे पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर अवघड गोष्ट आहे.

हे चित्र भिंतीवर काढा त्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा म्हणजे हायवेवरुन दिसेल, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला आहे. हा काय सातारच्या विकासाचा विषय नाही की शहरात अमुलाग्र बदल होणार आहे, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe