अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आकांडतांडव !

Updated on -

निमंत्रणाची वाट कसली पाहाता ? तुम्ही सोहळ्यात सहभागी न झाल्याने काहीही फरक पडणार नाही, अशा सडेतोड शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अयोध्येच्या कार्यक्रमाचे निमंत्रण न मिळाल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आकांडतांडव सुरू आहे. हा सोहळा राजकीय नव्हे, तर कोट्यवधी भारतीयांच्या मनातील आहे असे त्यांनी बोलताना सांगितले

शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकार लोकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. उद्या निवडणुका झाल्या तरी, राज्यात महायुतीचेच सरकार येणार आणि देशातील तीन राज्यांचा निकाल पाहिला तर, देशामध्ये पुन्हा भाजपाचेच सरकार येणार आहे.

असे कितीही सव्हें आले तरी, देशातील जनतेच्या मनात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्यामुळे राज्यातही लोकसभा निवडणुकीत ४५च्या पुढे जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डी येथील दौऱ्यात मी पंतप्रधानांना तलवार भेट दिली आहे.

त्या तलवारीवर विष्णूच्या दशावताराची चित्रे आहेत. जेव्हा अपप्रवृत्ती तयार होतात, तेव्हा भगवान विष्णू अवतार घेतातच. विरोधकांना त्यांची भीती आहे. लोकशाही मार्गाने त्यांचे पानीपत करण्यासाठी पंतप्रधान मोदी दशावताराच्या भूमिकेतच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दूध अनुदानाबाबत नियमावली निश्चित होणार

सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आहे. काही गैरप्रकार झाल्यास कारवाई करता येते. खासगी दूध संघांवर मात्र सरकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे खासगी संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या बाबतीतील मागणी पुढे आली आहे.

याबाबत पुढील आठवड्यात बैठक बोलविण्यात आली असून, यासाठी काही नियमावली आम्ही निश्चित करीत आहोत. इतर शेतकऱ्यांनाही अनुदान योजनेत सहभागी करून घेण्याचा विचार करू; मात्र अनुदानाच्या निर्णयामध्ये सहकारी संस्थांना २९ रुपये दर देणे बंधनकारक असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

ज्यांच्यामुळे आरक्षण गेलं, त्यांच्या घरावर मोर्चे न्यावेत

कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजालाही याची खात्री आहे. जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता भासणार नाही. उलट त्यांनी ज्यांच्यामुळे आरक्षण गेलं त्यांच्या घरावर मोर्चे नेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी जरांगे यांना केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe