महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, आजपासून आचारसंहिता सुरू, २० नोव्हेंबरला मतदान, निवडणुकीचा निकाल कधी ? पहा…

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीची निवडणूक एका टप्प्यात होणार आहेत. पुढील महिन्यात अर्थातच नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी अर्थातच 23 नोव्हेंबर 2024 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Vidhansabha Nivdnuk

Vidhansabha Nivdnuk : लोकसभा निवडणुकीनंतर साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. आज अखेर विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.

यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची वाट पाहिली जात होती त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कशा आहेत, कोणत्या तारखेला मतदान होणार आणि निवडणुकीचा निकाल कधी लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

मतदानाची प्रक्रिया कधी पार पडणार

भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीची निवडणूक एका टप्प्यात होणार आहेत. पुढील महिन्यात अर्थातच नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार आहे.

20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी अर्थातच 23 नोव्हेंबर 2024 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज निवडणुकांचा तारखांची घोषणा झाली असल्याने आजपासूनच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र विधानसभा 26 नोव्हेंबरला विसर्जित होणार आहे. अशा परिस्थितीत या तारखे आधीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ नवीन सरकार स्थापित होणे अपेक्षित आहे.

याच अनुषंगाने आज निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे.

आज निवडणूक आयोगाने झारखंड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे.

महाविकास आघाडी मधील काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट तसेच महायुती मधील भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि स्वराज्य पक्ष हे देखील आपले उमेदवार उतरवणार आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्यात?

भाजप – 108
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बविआ – 3
मनसे – 1
एमआयएम – 2
समाजवादी पक्ष – 2
प्रहार – 2
जनसुराज्य – 1
स्वाभिमानी शेतकरी पक्ष – 1
शेकाप – 1
रासप – 1
माकप – 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 1
अपक्ष – 13

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe