Vastu Tips:- घराचे बांधकाम करायचे असो किंवा नवीन घर खरेदी करायचे असो यामध्ये घराची रचना किंवा घरातील महत्त्वाच्या बाबी या वास्तुशास्त्रानुसार आहेत का? हे पाहणे देखील खूप महत्त्वाचे असते. बरेचजण वास्तुशास्त्रानुसारच घराचे बांधकाम करतात व अंतर्गत रचना देखील वास्तुशास्त्रानुसार करत असतात.
असे म्हटले जाते की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर घराचे बांधकाम झाल्याने किंवा घरातील काही महत्त्वाच्या गोष्टी जसे की देवघर किंवा स्वयंपाक घर, बेडरूम किंवा बाथरूम जर चुकीच्या दिशेला असेल तर त्या घरामध्ये वास्तुदोष असतो व त्यामुळे घरामध्ये सुख शांतीचा अभाव किंवा पैसा हातात न टिकणे इत्यादी समस्या उद्भवतात.
त्यामुळे घराची रचना वास्तुशास्त्रानुसारच होणे हे गरजेचे असते. या अनुषंगाने या लेखात आपण घरातील देवघर म्हणजेच मंदिर नेमके कोणत्या दिशेला असावे किंवा त्याचा आकार कसा असावा? ही व इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत. जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार जर देवघर असेल तर घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहील व जीवनात सुख समृद्धीची कमतरता राहणार नाही.
काय आहेत वास्तुशास्त्रानुसार देवघराचे नियम?
जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर ज्या ठिकाणी तुम्हाला देवघर बांधायचे आहे किंवा ज्या ठिकाणी देवघर बांधले आहे त्या ठिकाणी स्वच्छतेचे संपूर्ण नियम पाळणे खूप गरजेचे आहे. तसेच घरामध्ये देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावे. असं म्हटले जाते की देवी देवतांचा वास या ठिकाणी असतो.
तसेच तुम्ही देवघर हे तुमच्या सोयीनुसार लाकूड किंवा दगडाचे बनवू शकता. तसेच वास्तुशास्त्रानुसार बघितले तर सूर्य उगवणारी पूर्व दिशा ही अतिशय शुभ मानली जाते. या दिशेला जर घरातील मंदिर लावले तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार व्हायला मदत होते व उत्तर पूर्व दिशेला जर मंदिराची स्थापना केली तर घरात सकारात्मक वातावरण कायम टिकते. त्यामुळे पूर्व दिशेलाच मंदिराची उभारणी करावी.
देवघरात चुकून वाळलेली फुले ठेवू नयेत
आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की देवाला आपण जे काही फुले किंवा हार अर्पण करतो. त्यानंतर मात्र फुले किंवा हार कित्येक दिवस त्या ठिकाणी असेच पडून राहतात. वास्तुशास्त्रानुसार जर बघितले तर अशा प्रकारची वाळलेली फुले किंवा हार घरातील मंदिरात कधीच ठेवू नये. कारण यामुळे घरात वास्तुदोष तयार व्हायला मदत होते.
मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करताना काय नियम पाळावेत?
घरात उभारलेल्या मंदिरात जर मूर्तीचे प्रतिष्ठान करायचे असेल तर त्या अगोदर मंदिर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे व त्यावर असं पसरवून मग देवाची मूर्ती ठेवावी. याबद्दल वास्तुशास्त्र म्हणते की असे केल्याने घरात देवी देवतांचा वास राहतो व घरात सुख समृद्धी नांदते.
भिंतीजवळ मूर्ती ठेवू नये
वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बघितले तर कुठल्याही देवाची मूर्ती भिंतीजवळ ठेवू नये. जर अशा पद्धतीने भिंतीजवळ मूर्ती ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यामुळे देवाच्या मूर्ती असतील तर त्या भिंतीच्या समोर ठेवाव्यात. तसेच याबाबत जर आपण पौराणिक मान्यता पाहिली तर पूजा करताना किंवा इतर शुभ कार्य करताना भिंतीला टेकून बसू नये.
देवघरामध्ये एक किंवा अधिक प्रकारच्या मूर्ती ठेवू नयेत. यामध्ये दोन शिवलिंग किंवा दोन शालिग्राम, दोन शंख किंवा दोन सूर्यमुर्ती, तीन गणेश मूर्ती आणि तीन देवीच्या मूर्ती देवघरात एकत्र ठेवू नयेत. असे म्हणतात की असे जर केले तर घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते.
बेडरूममध्ये देवघर नसावे
बऱ्याच घरांमध्ये जागेची कमतरता असते व त्यामुळे आपण ज्या खोलीत झोपतो त्याच खोलीत देवघर असते. परंतु यावेळी जर तुम्ही झोपत असाल तेव्हा तुमचा बेड अशा दिशेला असावा की त्या ठिकाणी तुमचे पाय मंदिराच्या दिशेला ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच पलंग हा मंदिरापासून काही अंतरावर ठेवावा असे देखील वास्तुशास्त्र म्हणते.
(टीप- वरील माहिती ही वास्तुशास्त्रावर आधारित असून ती वाचकांसाठी माहितीकरिता सादर केलेली आहे. या माहितीविषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा या माहितीचे समर्थन करत नाही.)