घर,फ्लॅट,दुकान खरेदी करून नोंदणी केल्यानंतर अवश्य करा ‘हे’ काम! नाहीतर पैसे ही जातील आणि मालमत्ता ही जाईल

Ajay Patil
Published:
property law

कुठल्याही मालमत्तेचा व्यवहार करताना म्हणजेच खरेदी विक्री करताना आपल्याला प्रत्येक बाबतीत काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर भविष्यकाळामध्ये अशा खरेदी विक्री व्यवहारांमध्ये एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराचा मनस्ताप देऊ शकते. कारण अशा व्यवहारांमध्ये खूप कायदेशीरदृष्ट्या काळजी घेऊन सगळ्या बाबी पूर्ण करणे खूप गरजेचे असते.

यामध्ये कागदपत्र तपासणी पासून तर इतर खरेदी विक्री व्यवहारातील महत्त्वाच्या पायऱ्या काळजीपूर्वक बघून त्या पूर्ण करणे महत्त्वाचे असते. जेणेकरून अशा प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारातून आपला पैसा बुडू नये किंवा पुढे काही कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे असते.

साधारणपणे जेव्हा आपण एखादे घर, फ्लॅट किंवा दुकान तसेच जमीन खरेदी करतो तेव्हा खरेदी करताना तहसीलदार ऑफिसमध्ये त्याची नोंदणी करून आपण मोकळे होऊन जातो. सगळ्यात महत्त्वाचे काम हे नोंदणी करून झाल्यानंतर असते हे बऱ्याच जणांना माहितीच नसतं. तुम्ही अशी प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर तिचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर म्युटेशन करणे खूप गरजेचे असते त्यानंतरच तुमच्या व्यवहार हा कायदेशीरदृष्ट्या पूर्ण होतो.

 म्युटेशन करणे म्हणजे नेमके काय?

समजा एखाद्या व्यक्तीने एखादी प्रॉपर्टी खरेदी केली व तिची नोंदणी देखील केली तर संबंधित व्यक्तीला त्या मालमत्तेचा मालकी हक्क मिळतो का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. कारण प्रॉपर्टी खरेदी करून नोंदणी केल्यानंतर संबंधित मालमत्तेचा मालकी हक्क मिळत नाही तर त्याकरिता म्युटेशन करणे गरजेचे असते.

म्युटेशन केले नाही तर अशा प्रॉपर्टीच्या संबंधित काही वाद निर्माण होऊ शकतात. याबाबत असलेला भारतीय नोंदणी कायदा बघितला तर त्यानुसार कोणत्याही मालमत्तेची जर खरेदी केली तर त्यानंतर त्या संबंधीची लिखित नोंदणी करावी लागते व ही नोंदणी उपनिबंध कार्यालयामध्ये करतात.

परंतु अशी नोंदणी केल्यामुळे मालमत्तेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही तर त्याकरिता म्युटेशन करावे लागते व त्यानंतरच मालमत्तेवर हक्क प्रस्थापित होतो. जेव्हा म्युटेशन केले जाते तेव्हाच मालमत्तेचे हक्क खरेदीदाराकडे येतात. म्हणजेच संबंधित मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर जेव्हा दाखल खारीज होते तेव्हा संबंधित मालमत्तेचे हक्क खरेदीदाराकडे येत असतात.

ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होते तेव्हा सरकारी दप्तरामध्ये तुमचे नाव समाविष्ट केले जाते व जुन्या मालकाचे नाव त्या मालमत्तेवरून हटवले जाते. त्यामुळे कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या खरेदीदारासाठी म्युटेशन ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.

जर तुम्ही फक्त नोंदणी करून विषय संपवला तर मात्र एखाद्या वेळेस भविष्यकाळात त्या प्रॉपर्टीचा जुना मालक पुन्हा मालमत्तेवर हक्क दाखवण्याची शक्यता असते व त्यामुळे कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊन मानसिक त्रास होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe