मोठी बातमी ! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार, ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार होईल आणि या प्रस्तावावर फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे.

7th Pay Commission News

7th Pay Commission News : हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. फडणवीस सरकार राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे.

या सरकारी नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता देखील 53% होणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात होऊ शकतो असा अंदाज आहे. खरंतर ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला.

यानुसार, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही महागाई भत्ता वाढ मात्र जुलै महिन्यापासून लागू झाली आहे. दरम्यान आता राज्य शासनात कार्यरत असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा तीन टक्क्यांनी वाढणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. मात्र आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार होईल आणि या प्रस्तावावर फडणवीस सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे. या चालू महिन्यातच म्हणजेच डिसेंबर महिन्यातच या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता देखील आहे.

डिसेंबर महिन्यात या प्रस्तावावर अंतिम निर्णय झाला तर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा लाभ हा डिसेंबर महिन्याच्या पगारांसोबत दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासूनच लागू राहणार आहे. अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा यावेळी मिळणार आहे.

महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय केव्हा निघणार?

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून लवकरच सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. मग प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल आणि लगेचच याचा शासन निर्णय निर्गमित होणार आहे.

हिवाळी अधिवेशन संपले की त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे.

याबाबतचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात होण्याची शक्यता आता व्यक्त होत असून जर येत्या दोन-तीन दिवसात याबाबतचा जीआर निर्गमित झाला तर डिसेंबर महिन्याच्या पगारांसोबत म्हणजेच जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात जो पगार येईल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे. नक्कीच नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe