7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शन धारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने दिवाळीपूर्वी एक मोठी भेट दिली आहे. देशभरातील एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकांचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढला आहे. अर्थातच आता सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

आधी 50 टक्के दराने हा भत्ता दिला जात होता. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. मात्र याचा रोख लाभ हा ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत मिळणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना वाढीव महागाई भत्त्याचा आणि महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ मिळणार आहे.
जुलै महिन्यापासून ही महागाई भत्ता वाढ लागू असल्याने या सदर नोकरदार मंडळीला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम दिली जाणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 50 हजार रुपये आहे त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत किती महागाई भत्ता मिळणार आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम किती मिळणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
50 हजार पगार असल्यास पगारात किती वाढ होणार?
ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा पन्नास हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू झाली असल्याने त्यांच्या मासिक पगारात 1,500 रुपयांची वाढ होणार आहे.
महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे पगारात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे म्हणजेच 4500 महागाई भत्ता फरकाची रक्कम या पगारासोबत दिली जाणार आहे.
अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारात 50 हजार रुपये मूळ पगार असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अतिरिक्त 6000 रुपयांची भर पडणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात सरकारी नोकरदार मंडळीला नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे.