7th Pay Commission News : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षात दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जात असतो. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता चा लाभ दिला जात असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू आहे.
आता जानेवारी 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत. हे नवीन दर जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरवले जातील. सध्या स्थितीला एआयसीपीआयची नोव्हेंबर महिन्यापर्यंतची आकडेवारी समोर आली आहे.
नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यामधून महागाई भत्ता वाढीचा ट्रेंड स्पष्ट होत आहे. गेल्या वेळी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. आता या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा तीन टक्क्यांची वाढ होणार आहे म्हणजेच हा भत्ता 56 टक्क्यांवर जाईल.
खरेतर, ऑक्टोबर 2024 पर्यंत DA स्कोअर 55.05% होता, आता नोव्हेंबरच्या आकडेवारीत तो 55.54% पर्यंत वाढला आहे. म्हणजेच यामध्ये फारच मामुली वाढ झाली आहे. सध्याच्या या दरानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना फक्त 56% दराने महागाई भत्ता मिळेल असे दिसते.
मात्र असे असले तरी जेव्हा डिसेंबर महिन्याच्या आकडे समोर येतील तेव्हाच महागाई भत्ता कितीने वाढणार हे स्पष्ट होईल. 31 जानेवारी 2025 पर्यंत डिसेंबर महिन्याचे आकडे कामगार मंत्रालयाकडून जाहीर केले जातील आणि त्यानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरणार आहे.
पण सध्याची आकडेवारी पाहिली असता जाणकार लोक जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलत आहेत. म्हणजेच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 53 टक्क्यांवरून 56 टक्के होणार आहे.
यामुळे संबंधित नोकरदार मंडळीच्या पगारात नक्कीच वाढ होईल आणि यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंतची एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे अन यानुसार महागाई भत्ता 56% होईल असे दिसते. पण अनेकांच्या माध्यमातून डिसेंबरची आकडेवारी समोर आल्यानंतर महागाई भत्ता 56% पेक्षा अधिक होऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्याचा ट्रेंड पाहता, महागाई भत्त्यात केवळ ३ टक्क्यांनी वाढ होईल, असे दिसते. कारण, नोव्हेंबरपर्यंत निर्देशांक १४४.५ अंकांवर आहे. त्यात थेट 1 पॉइंटची वाढ झाली तरी, महागाई भत्त्याची एकूण संख्या केवळ 56.16% पर्यंत पोहोचेल. या स्थितीतही कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केवळ ५६ टक्केच राहणार आहे.