8th Pay Commission:- केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता, घर भाडेभत्ता व त्यासोबत इतर भत्ते खूप महत्त्वाचे असतात. कारण कर्मचाऱ्यांची पगार आणि मिळणारे हे भत्ते यांचा सरळ संबंध येत असल्याने अशा भत्त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांना सध्या जे काही वेतन आणि भत्ते दिले जात आहेत ते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिले जात आहेत.
सध्या सातवा वेतन आयोग सुरू असून दोन वेतन आयोगांमध्ये सुमारे दहा वर्षाच्या अंतर असते. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांची पगार आणि निवृत्ती वेतन त्यामध्ये सुधारणा करता यावी याकरिता पुढील वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता सुरू असलेल्या सातवा वेतन आयोगाची मर्यादा किंवा कार्यकाळ हा 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे व त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशी शक्यता आहे.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना जे काही वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन दिले जात आहे ते अपडेट करण्याकरिता आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारच्या माध्यमातून लागू केल्या जातील. साहजिकच जेव्हा आठवा वेतन आयोग लागू होईल तेव्हा कर्मचाऱ्यांच्या किमान व कमाल मूळ पगारांमध्ये वाढ होईल.
कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये होईल वाढ?
जर आपण फायनान्शिअल एक्सप्रेसचा अहवाल पाहिला तर त्यानुसार जेव्हा आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल आणि त्यासोबत 3.68 पर्यंत अपेक्षित फिटमेंट फॅक्टर वाढेल.तेव्हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची जी काही रचना आहे त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले
तर पे मॅट्रिक्स तर एक वर मूळ पगार सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत अठरा हजार रुपये आहे व आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर तो 18 वरून 21 हजार 600 रुपये पर्यंत वाढेल. म्हणजेच कमाल स्तरावर पे मॅट्रिक्स तर 18 हजारावर मूळ पगार दोन लाख 50 हजार रुपयावरून तीन लाख रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये फिटमेंट फॅक्टर असतो महत्त्वाचा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्याची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. सध्या कर्मचाऱ्यांना 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर मिळत असून याचाच अर्थ असा होतो की कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन त्याच्या किमान वेतनाच्या 2.57 पट असेल. आठव्या वेतन आयोगानंतर फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना मिळतील हे भत्ते
येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आठवा वेतन आयोगाची संबंधित घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारच्या माध्यमातून याबाबत कुठलाही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत काहीतरी निर्णय होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जर कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला गेला तर घर भाडेभत्ता, वाहतूक भत्ता आणि महागाई भत्ता यासारखे इतर लाभ आणि इतर भत्त्यांमध्ये देखील बदल होण्याची दाट शक्यता आहे. जेव्हा आठवा वेतन आयोग लागू केला जाईल तेव्हा महागाई आणि राहणीमानाचा जो काही वाढता खर्च आहे
त्याच्यात होणारे बदल देखील विचारात घेतले जातील. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर अंदाजे त्याचा लाभ देशातील 67.85 लाख निवृत्ती वेतनधारक व 48.62 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी यांना होईल.