8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभरात आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली.
अजून आठव्या वेतन आयोगाची स्थापना मात्र झालेली नाही पण लवकरच नव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती येत्या काही दिवसांनी होईल आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू होणार आहे.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा फायदा होणार आहे. पण त्याआधी आपण आठव्या वेतन आयोगाच्या बाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
सध्याच्या सातव्या वेतन आयोग अंतर्गत ज्या पेन्शन धारकांना 22,450, 59 हजार 250 आणि 65 हजार 550 रुपये एवढे पेन्शन मिळत आहे त्यांना आठव्या वेतन आयोगात किती पेन्शन मिळणार याचे कॅल्क्युलेशन आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून सक्रिय आहे. वेतन आयोगाचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो.
म्हणजेच आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग 31 डिसेंबर 2025 रोजी संपेल आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार आहे.
नव्या वेतन आयोगात पेन्शन किती वाढणार
नव्या वेतन आयोगात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार हे सर्वस्वी फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून राहणार आहे. सध्याच्या सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता.
मात्र आता नव्या वेतन आयोगात काहीजण हा फॅक्टर 1.92 होईल असे सांगत आहे तर काहीजण सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच हा फॅक्टर 2.57 एवढा राहील असे सांगत आहे. एवढेच नाही तर काही तज्ञांकडून हा फॅक्टर 2.86 पर्यंत वाढू शकतो असाही आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.
आता आपण फिटमेंट फॅक्टर 1.92 किंवा 2.57 इतका झाला तर पेन्शन धारकांची पेन्शन किती वाढणार याचे गणित समजून घेऊयात. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 करण्यात आला होता यामुळे किमान पेन्शन ही 9000 रुपये एवढी झाली होती.
दरम्यान आता नव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.92 इतका करण्यात आला तर 22450 रुपये बेसिक पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन 43 हजार 104 रुपये एवढी होणार आहे. 59,250 रुपये बेसिक पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन एक लाख 13 हजार 760 रुपये इतकी होणार आहे आणि 65,550 रुपये एवढी पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन एक लाख 25 हजार 856 एवढी होणार आहे.
जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका झाला तर 22450 रुपये बेसिक पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन 57 हजार 696 रुपये एवढी होणार आहे. 59,250 रुपये बेसिक पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन एक लाख 52 हजार 772 रुपये इतकी होणार आहे आणि 65,550 रुपये एवढी पेन्शन असणाऱ्यांची पेन्शन एक लाख 68 हजार 463 एवढी होणार आहे.