Business Success Story:- मनामध्ये जर जिद्द आणि चिकाटी,जी गोष्ट ठरवली आहे ती पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याचा अट्टाहास, जोपर्यंत ठरवलेले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्नांमध्ये ठेवलेले सातत्य आणि कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता त्या अडचणीशी दोन हात करत मार्ग काढत यशाच्या दिशेने केलेली वाटचाल इत्यादी गुण हे यशस्वी होण्यासाठी खूप फायद्याचे ठरतात.
हे गुण असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.तसेच आपल्याकडे लाखो ते कोटी रुपये पॅकेजची नोकरी आहे आणि ती नोकरी सोडून एखाद्या व्यवसायामध्ये पडणे हे त्यातल्या त्यात अत्यंत जोखमीचे काम समजले जाते.
परंतु आजकालचे तरुणाई जर आपण बघितली तर कुठल्याही पद्धतीची जोखीम स्विकारण्यासाठी ते कायमच तयार असतात. ‘रिस्क है तो यश फिक्स आहे’ अशा पद्धतीचे लॉजिक यामागे असते. त्यामुळे बरेच तरुण-तरुणी आपल्याला लाखो ते कोटी रुपयांचे पॅकेजच्या नोकऱ्या सोडून एखाद्या व्यवसायामध्ये पडल्याचे दिसून येते व यशस्वी झाल्याचे देखील आपण पाहतो.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद येथे जन्म झालेल्या आरुषी अग्रवाल यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे. आरुषी यांची जर आपण शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी एमटेक पूर्ण केलेले आहे व उत्तम पगाराच्या दोन नोकरीच्या ऑफर त्यांना मिळाल्या
व यापैकी कुठलीही ऑफर त्यांनी स्वीकारली असती तरी कोट्यावधी रुपये वर्षाला कमावता आले असते. परंतु त्यांना मुळात नोकरी करायचीच नव्हती व काहीतरी व्यवसाय सुरू करायचा त्यांच्या मनामध्ये होतं व त्या पद्धतीनेच त्यांनी वाटचाल व प्रयत्न सुरू ठेवले.
आरुषी अग्रवाल यांनी टॅलेंट डिक्रीप्ट नावाच्या कंपनीची सुरुवात केली
आरुषी अग्रवाल यांनी एमटेक पूर्ण केल्यानंतर आलेल्या दोन उत्तम पगाराच्या नोकरीच्या ऑफर धुडकावल्या आणि काहीतरी वेगळे करावे या विचारात असताना त्यांनी 2020 मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करून टॅलेंट डीक्रिप्ट नावाची कंपनी सुरू केली.
जेव्हापासून या कंपनीची सुरुवात झाली तेव्हापासून अनेक बेरोजगार तरुण तरुणींकरिता नोकर भरतीसाठी एक विश्वासनीय असा प्लॅटफॉर्म तयार झाला. आरुषी यांची टॅलेंट डिक्रीप्ट कंपनी ही कोडिंगमध्ये कुशल असलेल्या तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय अशी कंपनी आहे.
ही कंपनी हॅकाथॉन आणि वर्चुअल स्किल्स मूल्यांकनाचे आयोजन करते व त्या माध्यमातून जे तरुण नोकरीच्या शोधात असतात त्या तरुणांमध्ये त्यांचे कौशल्य पाहून संबंधित कौशल्य हवे असलेल्या कंपन्या या दोघांमध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडते व नोकरी मिळवण्यासाठी मदत करते.
या कंपनीच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराचे ऑनलाईन मूल्यांकन जेव्हा केले जाते तेव्हा उमेदवार कोणतेही अनधिकृत उपकरण वापरू शकत नाही याची खातरजमा देखील या कंपनीच्या सिक्युरिटी फीचर्सच्या माध्यमातून केली जाते. आरुषी अग्रवाल यांची टॅलेंट डीक्रिप्ट ही कंपनी तरुणांना आवडत्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते.
या कंपनीची पाळेमुळे आज भारतातच नाही तर जर्मनी, अमेरिका, तसेच श्रीलंका व नेपाळ इत्यादी देशांपर्यंत पोहोचले असून या देशातील सुमारे 380 कंपन्या टॅलेंट डिक्रिप्ट या कंपनीकडून सेवा घेतात. आरुषी अग्रवाल यांच्या कंपनीच्या माध्यमातून आज बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
कंपनी सुरू करण्याच्या अगोदर आरुषी अग्रवाल या काय करत होत्या?
जर आपण आरुषी अग्रवाल यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी जे पी इन्स्टिट्यूट मधून बी टेक आणि एमटेक चे शिक्षण पूर्ण केले आहे व नंतर आयआयटी दिल्लीत इंटर्नशीप केली आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर एक कोटी रुपयांचे पॅकेज असलेल्या दोन नोकरीच्या ऑफर त्यांना आल्या परंतु त्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत.
2018 मध्ये त्यांनी कोडींग शिकून घेतले व सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली व त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये म्हणजेच 2020 मध्ये एक लाख रुपयाची गुंतवणूक करून टॅलेंट डीक्रिप्ट कंपनी सुरू केली व तरुणांसाठी नोकरी मिळवण्यासाठी एक विश्वासाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला.