Dragon Fruit Farming: गेल्या काही वर्षापासून जर आपण बघितले तर शेती क्षेत्रामध्ये आता उच्चशिक्षित तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्यामुळे करिअरच्या दृष्टिकोनातून अनेक उच्च शिक्षित तरुणांनी शेतीची निवड केल्याचे आपल्याला दिसून येते.
उच्चशिक्षित तरुणांनी शेतीमध्ये येण्याचा एक मोठा फायदा असा झाला की, या तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या लागवडीतून शेती समृद्ध करण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालवले असून त्यामध्ये ते यशस्वी देखील होत आहेत.
पारंपारिक पिकांचा नाद सोडून त्याऐवजी भाजीपाला पिके तसेच फळपिके अशा पिकांचे उत्पादन घेताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या दुहेरी संगमामुळे कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यामध्ये असे तरुण यशस्वी झाल्याचे आपण पाहतो.
याच पद्धतीने जर आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या वालसांगवी येथील काही तरुणांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी एकत्र येत 2022 मध्ये शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला. जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा ड्रॅगन फ्रुट शेतीची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या.
त्यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे असलेल्या ड्रॅगन फ्रुट शेतीला भेट दिली व ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय पक्का केला.नुसता मनामध्ये ठरवून हे तरुण थांबले नाहीत तर त्यांनी लगेच 25 रुपये प्रतिरोप या दराने ड्रॅगन फ्रुटच्या रोपांची बुकिंग केली. या तरुणांमध्ये बाळू उपोळकर नावाचा तरुण देखील होता व याने देखील ड्रॅगन फ्रुट रोपांची बुकिंग केली व एक एकर क्षेत्रामध्ये सुरुवातीला ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
बीडच्या तरुणाने एक एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळवले पंधरा लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसांगवी या गावचे काही तरुण एकत्र आले व त्यांनी ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला व या तरुणांमध्ये बाळू उपोळकर नावाचा तरुण देखील होता व याने देखील त्याच्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेऊन पंचवीस रुपये दराने रोपांची बुकिंग केली
व दहा बाय सहा या अंतरावर एक एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली व लागवड करताना मात्र दाणेदार खतांचा वापर केला. 2023 मध्ये बाळू यांना ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन मिळणे सुरू झाले व त्यांनी पहिल्या वर्षी एका एकर मध्ये 60 क्विंटलचे उत्पादन मिळवले.
विशेष म्हणजे त्यांनी पिकवलेल्या या ड्रॅगन फ्रुटला बाजारात 130 रुपये किलो असा दर मिळाला. यामध्ये चांगला पैसा राहिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला व त्यांनी आता साडेचार एकर क्षेत्रापैकी साडेतीन एकर मध्ये ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
नवीन लागवड केली टेलिस पद्धतीने
अगोदर एक एकर ड्रॅगन फ्रुट लागवडीतून चांगला पैसा मिळाल्यामुळे त्यांनी आता दुसऱ्या अडीच एकर क्षेत्रामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवड केली व ती लागवड करताना मात्र टेलिस पद्धतीचा वापर केला. या टेलीस पद्धतीने लागवड केल्याचा फायदा असा झाला की एका एकरमध्ये तब्बल 4000 रोपांची लागवड करणे शक्य झाले.
अगोदर जे त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सुरुवातीला लागवड केलेली होती ती दहा बाय सहा या अंतरावर केली होती व तेव्हा एका एकरमध्ये 2450 ड्रॅगन फ्रुटची रोपे लावता आली होती.
परंतु या नवीन अडीच एकर लागवडीसाठी त्यांनी टेलिस पद्धतीचा वापर केल्यामुळे तब्बल 1000 अधिकची रोपे लागल्यामुळे ड्रॅगन फ्रुट उत्पादनात त्यामुळे वाढ होईल. विशेष म्हणजे हा नवीनच प्रयोग केल्यामुळे परिसरातील शेतकरी देखील त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी बाळू उपोळकर यांच्या शेताला भेट देतात.
यावर्षी मिळून 170 क्विंटल उत्पादन
बाळू उपोळकर यांचा दुसरा मित्र तुषार यांनी देखील ड्रॅगन फ्रुटची लागवड केली असून त्यांची काढणी जून महिन्यापासून सुरू झालेली आहे. यावर्षी ड्रॅगन फ्रुटला 100 ते 130 रुपये किलोचा दर मिळाला असून एका एकरात आतापर्यंत 170 क्विंटल फळांचे उत्पादन त्यांना मिळाले.
सर्व खर्च वजा जाता त्यांना 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. वालसांगवी येथील आठ शेतकऱ्यांनी 2022 मध्ये एकत्र येऊन ड्रॅगन फ्रुटची लागवड केली व मोठ्या प्रमाणावर एकाच ठिकाणी ड्रॅगन फ्रुट उत्पादित करणे शक्य झाल्यामुळे रायपूर तसेच छत्तीसगड व सुरत येथील व्यापारी त्यांच्या बांधावरून ड्रॅगन फ्रुट खरेदी करत असल्याने वाहतुकीचा खर्च वाचून नफा जास्त राहण्यास मदत होत आहे.