Anandacha Shidha : राज्य शासनाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. दिवाळी प्रमाणेच गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा राज्यातील गरीब कुटुंबांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. म्हणजे आता गरीब कुटुंबांना 100 रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. मात्र गुढीपाडवा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला तरी देखील गरिबांना आनंदाचा शिधा मिळाला नाही.
यामुळे हा आनंदाचा शिधा नेमका केव्हा मिळणार असा प्रश्न गरीब जनतेकडून यावेळी उपस्थित होत आहे. वास्तविक 14 मार्चपासून राज्य कर्मचारी संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या मुख्य मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मोडणार नाही असा पवित्र घेतला आहे.
हे पण वाचा :- चर्चा तर होणारच ! डॉक्टराने चक्क गाईच्या वासराच केल शाही बारस; अख्या परिसरात रंगली या शाही सोहळ्याची चर्चा
यामुळे शासकीय कार्यालय ओस पडली आहेत. अशा परिस्थितीत अनेक शासकीय योजना खोळबल्या आहेत. सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे देखील यामुळे लांबनीवर पडले आहेत. दरम्यान आता आनंदाचा शिधा मिळण्यासही उशीर होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीमध्ये ज्या पद्धतीने शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला होता त्या प्रमाणे गुढीपाडवा आणि डॉक्टर आंबेडकर जयंतीला देखील हा शिधा दिला जाईल असा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील एक कोटी 63 लाख रेशन कार्ड धारकांना फायदा होणार आहे. पण संपामुळे आता शंभर रुपयात रवा, चणा, डाळ, साखर, गोडतेल गुढीपाडव्याला मिळणार का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
दिवाळीच्या वेळी देखील शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना उशीर झाला होता. अनेक जिल्ह्यात दिवाळीनंतर हा शिधा वाटप झाला होता. यामुळे यावेळी देखील गुढीपाडव्यानंतरच हा शिधा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अद्याप पुरवठा विभागाकडे राज्य शासनाकडून या शिधाची पॉकेट मिळालेले नाहीत.
यामुळे ही पॉकेट पुरवठा विभागाकडे ज्यावेळी येथील त्यावेळी पुरवठा विभागाकडून ही संबंधित रेशन दुकानदारांकडे वर्ग होतील असं सांगितलं जात आहे. एकंदरीत शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी आता गुढीपाडव्यानंतरच होऊ शकते असं सांगितलं जात आहे. यामुळे गोरगरिबांचा सण गोड करण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय सण गोड करणारा नसून सण उलटून गेल्यावरच गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद खुलणार आहे.
हे पण वाचा :- बातमी कामाची ! कमी व्याजदरात कर्ज हवे आहे का? मग करा हे एक काम, स्वस्तात अन तात्काळ Loan मिळणार