Business Success Story: 17 वेळेस अपयश आलेल्या व्यक्तीने सुरू केले शेअरचॅट; आज आहे 40 हजार कोटी रुपयांचे मूल्य, वाचा यशोगाथा

Published on -

Business Success Story:- व्यक्ती जेव्हा काही गोष्ट करायला हातात घेतो तेव्हा बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट आणि मेहनत घेऊन देखील अपयश येते व अशा अपयशामुळे व्यक्ती खचून जाते. परंतु आपल्याला असे अनेक उद्योजक किंवा यशस्वी लोक दिसून येतात की ते कितीही अपयश आले तरी परत उठतात व पुन्हा जोमाने सुरुवात करून अपयश का आले याचा नीट अभ्यास करून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू करतात व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात.

परंतु जर एक नाही दोन नाही तर तब्बल 17 वेळेस अपयश आल्यानंतर मात्र व्यक्ती काय करेल याबाबत आपल्याला काही सांगता येणार नाही. इतक्या वेळेस अपयश आल्यानंतर तर बरेच व्यक्ती प्रयत्न करणे सोडतील. परंतु याला  अंकुश सचदेव हे अपवाद आहेत. कारण या व्यक्तीने 17 स्टार्टअप सुरू केले व प्रत्येक वेळेस त्यांना अपयश  आले. परंतु तरीदेखील अठरावा प्रयत्नमध्ये त्यांनी शेअर चॅट नावाची कंपनी उभारली व ती कंपनी आता यशाच्या शिखरावर पोचली आहे.

 कशी झाली शेअर चॅटची सुरुवात?

अंकुश सचदेव हे उच्चशिक्षित असून त्यांनी आयआयटी कानपूर मधून कॉम्प्युटर सायन्स मध्ये बीटेक पूर्ण केलेले आहे. ज्याप्रमाणे आयआयटी पदविधर असलेले तरुण-तरुणी हे दूरदृष्टी तसेच कठोर परिश्रम इतरांपेक्षा वेगळे विचार करण्यासाठी ओळखले जातात.अगदी हेच गुण अंकुश सचदेव यांच्यामध्ये देखील होते. पदवी मिळवल्यानंतर पहिली कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

परंतु त्यामध्ये त्यांना सपशेल अपयश आले. परंतु तरीदेखील खचून न जाता त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली व त्यावेळेस देखील त्यांचा प्रयत्न अपयशी ठरला. अशाप्रकारे एक एक करून त्यांनी तब्बल 17 स्टार्टअप सुरू केले परंतु प्रत्येक स्टार्टअप त्यांचा फेल गेला. परंतु अठराव्यांदा अंकुश यांना नशिबाने साथ दिली व त्यांनी शेअरचॅट सुरू केले.

आपल्याला माहित आहे की शेअर चॅट हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून भारतीयांमध्ये ते खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे प्लॅटफॉर्म 15 भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेअरचॅटची निर्मिती करताना अंकुश सचदेव यांनी ओळखले होते की भारतातील ग्रामीण भाग व लहान शहरे यांना जोडण्याकरिता त्यांच्या भाषेमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे व या निर्णयामुळे शेअर चॅटला आज इतके मोठे यश मिळाले आहे.

 दोन मित्रांची मिळाली साथ

2015 मध्ये अंकुश सचदेव यांनी पदवी मिळवली व त्यापूर्वी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांनी इंटर्निंग केले होते. सतरा वेळा स्टार्टअप सुरू करण्यात अपयश आल्यानंतर मात्र अंकुश यांनी त्यांचे दोन आयआयटीएन मित्र फरीद अहसान आणि भानुसिंग यांच्यासोबत शेअर चॅट एप्लीकेशनची लॉन्चिंग केले.हे एप्लीकेशन ऑक्टोबर 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते व जून 2022 पर्यंत शेअरचॅटचे मूल्य अंदाजे चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!