Auction Property Rule:- आजकालच्या कालावधीमध्ये प्रत्येकाची इच्छा असते की एखाद्या मोठ्या शहरांमध्ये किंवा इतर ठिकाणी आपले स्वतःचे घर असावे व हे स्वप्न प्रत्येकजण बाळगून असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत घर आणि जागा यांच्या वाढलेल्या किमती पाहता प्रत्येकालाच घर बांधणे किंवा घर खरेदी करणे शक्य होत नाही व त्यामुळे बऱ्याच लोकांचे घर घेण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते.
परंतु आता बँक किंवा इतर वित्तीय संस्था यांच्याकडून आपल्याला सहजपणे गृहकर्ज मिळत असल्यामुळे आता बरेच लोक गृहकर्ज घेऊन घराची खरेदी करतात.आता साहजिकच कर्ज घेतले म्हणजे त्याचे हप्ते आपल्याला भरावे लागतात.

परंतु काही कारणास्तव बऱ्याच जणांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही व घेतलेल्या होमलोनचे हप्ते थकीत व्हायला लागतात.त्यानंतर बँक त्यासाठीचे नोटीस आपल्याला पाठवते व तरी देखील आपण बँकेचे हप्ते भरले नाही तर मात्र बँक सदर मालमत्तेचा लिलाव करते.
अशा लिलावाच्या माध्यमातून आपल्याला कमी किमतीमध्ये चांगल्या ठिकाणी घर किंवा फ्लॅट मिळू शकतो.परंतु अशा पद्धतीच्या लीलाव व प्रक्रियेच्या माध्यमातून प्रॉपर्टी खरेदी करण्याचे काही नियम असतात किंवा प्रॉपर्टीचा ताबा मिळवण्यासंबंधी देखील काही नियम असतात ते आपल्याला माहित असणे गरजेचे असते.
बँक लिलावातुन प्रॉपर्टी खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी
1- पेमेंटच्या अटी काय आहेत हे माहिती करून घ्या– जेव्हा बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारच्या लिलावातून मालमत्तेची विक्री केली जाते तेव्हा अशा प्रॉपर्टीच्या पेमेंटच्या एक प्लॅनिंग असते व ते तुम्हाला समजून घेणे गरजेचे असते. लिलाव केलेल्या मालमत्तेची पेमेंट देणे प्रक्रिया इतर मालमत्तेच्या पेमेंट प्लानपेक्षा वेगळी असते.
लिलावाच्या माध्यमातून ज्या प्रॉपर्टीची विक्री केली जाते तिच्या पेमेंट योजनेचा उल्लेख लिलावाच्या सूचनेमध्ये नमूद केलेला असतो. समजा लिलावात तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर अशा संभाव्य खरेदीदाराला या आधी एक विशिष्ट रक्कम बयाना ठेव म्हणून जमा करणे गरजेचे असते.
तसेच लिलाव प्रकरणांमध्ये ज्या दिवशी लीलाव होतो त्या दिवशी एकूण विक्री किमतीच्या 25% रक्कम भरावी लागेल आणि उरलेली पंधरा दिवसाच्या आत जमा करावी लागते.
2- मालमत्तेचा ताबा कधी मिळणार याबाबत माहिती करणे– लिलावात सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्ही पैसे देतात व त्यानंतर मात्र तुम्हाला त्या प्रॉपर्टीचा ताबा कधी मिळेल हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण या प्रक्रियेमध्ये जे व्यक्ती बोली जिंकतो त्या व्यक्तीला मालमत्तेचा मिळणारा ताबा हा लिलाव प्रतिकात्मक ताब्याद्वारे आहे की बँकेकडे मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा आहे किंवा नाही याबाबत माहिती करणे गरजेचे आहे.
प्रॉपर्टीचा केवळ प्रतीकात्मक ताबा असेल तर कायदेशीर प्रक्रियेमुळे खरेदीदाराला ताबा मिळण्यास काही कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत बँक दिलेल्या तारखेला मालमत्तेचा ताबा देण्यामध्ये विलंब करू शकतो. जर असे झाले तर लिलावद्वारे प्रॉपर्टी खरेदी केलेला खरेदीदार पैसे भरल्यानंतर बँकेला लेखी नोटीस किंवा कायदेशीर नोटीस पाठवू शकतो
व मालमत्तेचे जर काही वाद असतील तर ते मिटवून बँकेला ताबा देण्यासाठी सांगू शकतो. परंतु तरी देखील जर बँकेने प्रॉपर्टीचा ताबा देण्यामध्ये उशीर केला तर बँक व्याजासह भरलेली जी काही एकूण रक्कम असते ती देखील परत करण्यास जबाबदार असते.
3- ताबा मिळवण्याच्या कायदेशीर पद्धती समजून घेणे– तसेच लिलावामधून जी मालमत्ता आपण खरेदी करतो तिचा ताबा घेण्यापूर्वी खरेदीदाराने त्या मालमत्तेवर काही थकबाकी पेंडिंग आहे का हे पाहून घेणे गरजेचे आहे.
यामध्ये विज बिल तसेच पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स किंवा इतर कोणतीही थकबाकी आहे किंवा नाही हे देखील पाहून घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा असे होते की एखादी व्यक्ती तिची मालमत्ता बँकेने लिलाव केल्यानंतर देखील रिकामी करत नाही.
परिस्थितीत समस्या निर्माण होऊ शकते. त्यामध्ये जर कर्जदाराने जागा किंवा मालमत्ता रिकामी केले नाही तर बँकेला याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा आणि अधिकार क्षेत्रातील कोर्टच्या मदतीने प्रत्यक्ष ताबा घेण्याचा अधिकार आहे.