बाळासाहेबने सोडला स्पर्धा परीक्षांचा नाद आणि धरली शेतीची कास! सिमला मिरचीचे बंपर उत्पादन घेत मिळवले 10 लाखांचे उत्पन्न

भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाळासाहेब नाईककिंदे या तरुणाची यशोगाथा बघितली तर यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना यश न मिळाल्यामुळे शेती करण्याचा निर्णय घेतला व आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात करून यशस्वी देखील झाला.

Published on -

उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे सध्याच्या कालावधीमध्ये खूप दुरापास्त झाले असून त्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणी आता छोट्या मोठ्या व्यवसायाकडे वळले आहेत. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता खूपच कमी असल्याने प्रत्येकाला नोकरी मिळेलच याची कुठल्याही प्रकारची शाश्वती सध्याच्या कालावधीत नाही.

तसेच अनेक तरुण हे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नशीब आजमावतात व अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास करत असतात. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असे होत नाही व कित्येकदा अपयश पचवून प्रत्येक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून जाते.

त्यानंतर मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना नाईलाजाने त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय तसेच शेती व्यवसायाकडे वळावे लागते. परंतु आता अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीमध्ये येऊ लागल्यामुळे शेतीचा चेहरा मोहरा बदलून गेल्याचे आपण बघतो.

कारण असे उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि विविध पिक पद्धतींचा अवलंब करत लाखोत उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतांना आपल्याला दिसून येत आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाळासाहेब नाईककिंदे या तरुणाची यशोगाथा बघितली तर यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना यश न मिळाल्यामुळे शेती करण्याचा निर्णय घेतला व आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात करून यशस्वी देखील झाला.

 बाळासाहेब नाईककिंदे या तरुणाची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील बाळासाहेब नाईककिंदे या तरुणाची यशोगाथा बघितली तर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा बऱ्याचदा दिली.परंतु त्यामध्ये यश न मिळाल्यामुळे शेतीकडे मोर्चा वळवला व आधुनिक शेतीची कास धरत आज तो यशस्वी झाला आहे.

बाळासाहेब याने शेतीमध्ये सिमला मिरचीची लागवड करत चार महिन्यांमध्ये दहा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. 2008 पासून त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला व बरेच वर्षे अभ्यास केला आणि परीक्षा देखील दिल्या.

परंतु यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. तसेच दुसरीकडे घरची शेती होती व आई-वडिलांना शेती पाहण्यासाठी मदत करायला दुसरे कोणीच नव्हते. त्यामुळे शेतीची कामे वेळेवर होत नसल्यामुळे उत्पादनाला त्याचा फटका बसत होता.

या सगळ्या गोष्टींचा विचार करत बाळासाहेबने आधुनिक शेतीचा विचार करून शेती करण्याचा निर्णय घेतला व स्पर्धा परीक्षांचा नाद सोडला.त्यानंतर सिमला मिरचीची लागवड करायची ठरवले व सिमला मिरचीची तीन एकर क्षेत्रावर लागवड केली.

साधारणपणे गेल्या जुलै महिन्यामध्ये लागवड केलेल्या या सिमला मिरचीचे आतापर्यंत सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले असून अजून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.सिमला मिरचीचे दर्जेदार उत्पादन घेतल्यामुळे शेताच्या बांधावर येऊन व्यापाऱ्यांनी मिरचीची खरेदी करून चांगला दर देखील दिला.

एवढेच नाही तर त्यांच्या 18 एकर शेतीमध्ये ते पेरू तसेच कांदा व सोयाबीन सारखी पिके देखील उत्तम पद्धतीने घेतात व दर्जेदार उत्पादन मिळवतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!