Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
Bank Account Rules

सरकार ‘या’ लोकांची बँक खाती बंद करणार ! नेमके कोणाचे Bank Account बंद होणार ? सरकारचा नवा आदेश पहा….

Wednesday, November 13, 2024, 10:51 AM by Tejas B Shelar

Bank Account Rules : भारतातील बहुतांशी जनता आता बँकिंग सेवे सोबत जोडली गेली आहे. अगदी तळागाळातील व्यक्ती देखील बँकिंग सेवे सोबत जोडला गेला आहे आणि यामुळे भारतात पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत अधिक सोपे आणि पारदर्शक झाले आहेत. आधी भारताच्या ग्रामीण भागात फक्त आणि फक्त कॅशने म्हणजे रोकड व्यवहार होत असे. फारच कमी लोक बँकेच्या माध्यमातून व्यवहार करत असत.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे देशाच्या ग्रामीण भागातही लोक आता बँकिंग व्यवहाराला प्राधान्य देताना दिसत आहेत. हे सर्व काही होऊ शकलं ते शासनाच्या उत्कृष्ट धोरणांमुळे. 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली आणि या योजनेमुळे देशातील बहुतांशी भागांमधील अगदी तळागाळातील नागरिकांचे बँक अकाउंट ओपन झालेत.

Bank Account Rules
Bank Account Rules

शून्य रुपयात बँक अकाउंट ओपन करण्यात आले आणि यामुळे या योजनेला देशातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दाखवला. डिसेंबर 2014 पर्यंत या योजनेअंतर्गत देशातील 10.5 कोटी नागरिकांनी जनधन बँक अकाउंट ओपन केले.

दरम्यान याच जनधन योजनेअंतर्गत ज्या लोकांनी बँक अकाउंट ओपन केले आहे म्हणजेच ज्या लोकांचे जनधन बँक अकाउंट आहे अशा लोकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि कामाची बातमी समोर येत आहे.

सरकारने जनधन बँक खाते संदर्भात एक मोठा आदेश काढला आहे. १० वर्षांपासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा केवायसी करणे आवश्यक असल्याचा आदेश केंद्रातील मोदी सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी बँकांना अशा जन धन खात्यांसाठी नवीन KYC (Know Your Customer) प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे. एटीएम, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनेल यांसारख्या सर्व माध्यमांद्वारे जन धन खात्यांच्या री-केवायसीसाठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले गेले आहे.

सर्व बँकांनी जन धन खाती उघडण्याच्या वेळी सारख्याच उत्साहाने काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांची केवायसी पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. याशिवाय, केवायसी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिलेले आहेत.

अर्थातच जर तुमचेही जनधन बँक अकाउंट असेल तर तुम्हालाही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसी ची प्रक्रिया जर वेळेत पूर्ण केली गेली नाही तर संबंधित अकाउंट बंद देखील होऊ शकते. यामुळे केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून यासाठी बँकांना देखील निर्देश देण्यात आले आहेत.

Categories स्पेशल Tags Bank Account Rules
…….तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप हॅट्रिक करणार ! कसं आहे समीकरण ? वाचा…
संगमनेर तालुक्यातील लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी पासून दूर राहा- मंत्री विखे पाटील यांचे आवाहन
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress