…….तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप हॅट्रिक करणार ! कसं आहे समीकरण ? वाचा…

सध्या आमदार संग्राम जगताप हे मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. जगताप यांच्या प्रचार सभांना नागरिकांची तुफान गर्दी होत असून त्यांना महिला युवक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. जगताप हे मतदारांमध्ये आपण केलेल्या दहा वर्षांच्या कामांची माहिती घेऊन जात आहेत.

Tejas B Shelar
Published:
Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यातील लोकसभेच्या अनेक जागांवर महाविकास आघाडीचे भिडू विजयी ठरलेत. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे.

नगर शहर विधानसभा मतदारसंघातही दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरू असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याच्याच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

जगताप यांनी सेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांच्याकडून ही जागा आपल्या ताब्यात घेतली आणि गेली दहा वर्ष या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. जगताप पहिल्यांदा 2014 मध्ये विजयी झालेत. यानंतर 2019 मध्ये त्यांनी येथून दुसऱ्यांदा विजयी पताका फडकवली आणि ते आता हॅट्रिक करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

महायुतीकडून संग्राम जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. अर्थातच या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय. खरे तर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात युतीचे आधी प्राबल्य होते. ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला होती.

शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल राठोड यांनी 5 टर्म म्हणजेच 30 वर्ष नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र राठोड नंतर शिवसेनेत या ठिकाणी दुसरा कोणताच ताकतवर नेता उदयास आला नाही. दरम्यान संग्राम जगताप यांनी 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा पराभव करत या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

पण यंदा ते आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होणार का हा मोठा सवाल आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचे चुलते दादा कळमकर हे शहराचे माजी आमदार राहिले आहेत. यामुळे कळमकर विरुद्ध जगताप अशी ही लढत विशेष रंजक ठरणार आहे. खरे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना या जागेसाठी उत्सुक होती.

मात्र ही जागा शरद पवार गटाला गेली आणि कळमकर यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारीनंतर या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली मात्र ही बंडखोरी शमवण्यात आघाडीला यश आले. मात्र असे असले तरी ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली ते खरंच प्रामाणिकपणे कळमकर यांच्या बाजूने काम करणार का हा मोठा सवाल आहे.

सध्या आमदार संग्राम जगताप हे मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. जगताप यांच्या प्रचार सभांना नागरिकांची तुफान गर्दी होत असून त्यांना महिला युवक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. जगताप हे मतदारांमध्ये आपण केलेल्या दहा वर्षांच्या कामांची माहिती घेऊन जात आहेत.

संग्राम जगताप यांनी मतदार संघासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक निधी आणलाय, तेच महायुतीची सत्ता आल्यास संग्राम जगताप हे मंत्री होण्याचे प्रबळ दावेदार आहेत अन हे मुद्दे जगताप यांच्या बाजूने जात आहेत. जगताप यांनी एमआयडीसी चा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे.

शहरात सध्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत, आतापर्यंत शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, असे जगताप यांच्याकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला असला तरी देखील नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते.

अर्थातच या विधानसभा मतदारसंघात जगताप यांची ताकद कायम राहिली आहे. पक्ष फुटी नंतर ही लोकसभा निवडणुकीत जगताप यांनी चांगले मताधिक्य मिळवले असल्याने विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना असेच मताधिक्य मिळणार असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून आणि जगताप यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा नगर शहरातील अधिकाधिक नागरिकांना फायदा व्हावा यासाठी जगताप यांनी स्वतः जातीने लक्ष दिले आहे. यामुळे याचाही फायदा जगताप यांना निवडणुकीत होणार आहे.

दुसरीकडे महायुती मधील सर्वच घटक पक्षातील नेते जगताप यांच्या प्रचारासाठी मेहनत घेताना दिसत आहेत. यामुळे जगताप हे सध्या आघाडीवर आहेत. पण त्यांचा हॅट्रिक करण्याचा निर्धार यावेळी पूर्णत्वाला जाईल का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. नगरचा पुढचा आमदार कोण असेल हे 23 तारखेलाचं समजणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe