बापूरावांनी प्राचार्य पदाचा राजीनामा देऊन पाऊल ठेवले शेतीत! 5 एकर तैवान पिंक पेरू लागवडीतून मिळवतात 20 ते 25 लाखांचे उत्पन्न

खंडाळा तालुक्यातील सुखेड या गावचे प्रगतिशील शेतकरी डॉक्टर बापूराव जयवंत चोपडे यांचे उदाहरण घेतले तर ते नक्कीच या मुद्द्याला साजेसे आहे. बापूरावांनी थेट प्राचार्य पदाची नोकरी सोडली आणि शेतीत पाऊल ठेवून तैवान पिंक पेरूची लागवड केली.

Ajay Patil
Published:
taiwan pink peru

Taiwan Pink Peru Lagvad:- नोकरी मिळत नाही म्हणून शेतीत येणाऱ्या तरुणांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे. तसेच आपण नोकरी सोडून एखाद्या व्यवसायामध्ये येऊन त्या व्यवसायात यशस्वी झाल्याचे देखील अनेक उदाहरणे पाहिली असतील.

परंतु हातात असलेले चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायात येणे म्हणजे एकूण जोखीमयुक्त असे काम आहे. एकंदरीत पाहता ज्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात धाडस आहे आणि रुळलेली वाट सोडून काहीतरी वेगळे करण्याची इच्छा आहे असेच व्यक्ती चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीत येऊ शकतात व शेती यशस्वी करू शकतात.

कारण शेती हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शेतीला कायमच बिनभरवशाचा व्यवसाय म्हणून ओळखले जाते. परंतु आता शेतीचे स्वरूप पालटले असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असून कमी खर्चात व कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन घेऊन शेतकरी लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण खंडाळा तालुक्यातील सुखेड या गावचे प्रगतिशील शेतकरी डॉक्टर बापूराव जयवंत चोपडे यांचे उदाहरण घेतले तर ते नक्कीच या मुद्द्याला साजेसे आहे. बापूरावांनी थेट प्राचार्य पदाची नोकरी सोडली आणि शेतीत पाऊल ठेवून तैवान पिंक पेरूची लागवड केली. लागवडच केली नाही तर त्यापासून यशस्वीपणे ते उत्पादन घेत असून लाखोत उत्पन्न मिळवत आहे.

 प्राचार्य पदाची नोकरी सोडून तैवान पिंक पेरू लागवडीतून साधली प्रगती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेले सुखेड या गावचे प्रगतीशिल शेतकरी डॉ. बापूराव जयवंत चोपडे यांचे शिक्षण कृषी विद्यापीठातून एमएससी ऍग्री आणि पीएचडी पर्यंत झालेले आहे. त्यानंतर ते कोल्हापूर तालुक्यातील एका कृषी महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदावर नोकरीला होते.

इतक्या चांगल्या पगाराची नोकरी असताना देखील बापूरावांचे मन मात्र नोकरीमध्ये रमत नव्हते. शेतीची आणि गावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती व शेवटी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व गावाकडे परत येऊन वडिलोपार्जित शेती करण्याचे ठरवले. शेतीमध्ये कष्ट करण्याची त्यांची तयारी असल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित 15 एकर जमिनीवर थेट फळबाग लागवड केली व यातील पाच एकर वर तैवान पिंक पेरूची लागवड केली.

 अशा पद्धतीने केले तैवान पिंक पेरूचे व्यवस्थापन

त्यांनी पाच एकरमध्ये 12 बाय 6 फूट अंतरावर 3000 तैवान पिंक पेरूच्या जातीच्या रोपांची लागवड केली. या पेरूला पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला व प्रभावीपणे पाणी व्यवस्थापन केले.

तसेच पेरू बागेवर कुठल्याही प्रकारचे कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नेमकेपणाने आणि वेळेत कीड व रोगाचे व्यवस्थापन देखील सांभाळले. अशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन तसेच कीड रोग व्यवस्थापनाने खत व्यवस्थापन चोख पद्धतीने पार पाडून दहा महिन्यांनी त्यांच्या शेतातील पेरूच्या झाडांना आता फळ लगडली आहेत.

यामध्ये जर त्यांचा खर्च बघितला तर लागवड ते उत्पादन मिळवण्याच्या कालावधीपर्यंत रोपांची लागवड तसेच फवारणी, बागेतील विविध कामांसाठी लागणारी मजुरी, ठिबक सिंचन व इतर गोष्टींवरील खर्च मिळून सुरुवातीला दहा लाख रुपये खर्च करावा लागला.

यावर्षी त्यांना 90 ते 100 टन उत्पादन मिळाले व झालेला सर्व खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा 25 ते 30 लाख रुपयांपेक्षा अधिक मिळायला लागला आहे.बापूरावांची पंधरा एकर जमीन पाहिली तर ती पडीक माळरानाची जमीन होती व ज्या पाच एकर मध्ये त्यांनी तैवान पिंक पेरूची लागवड केलेली होती ती देखील जमीन माळरानाचीच होती. परंतु योग्य नियोजन व अथक परिश्रमाने त्या ठिकाणी त्यांनी लाखोत तैवान पिंक पेरूचे उत्पादन मिळविण्यात यश मिळवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe