बीडच्या शेतकऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम! ‘या’ जातीच्या दोडक्याची अर्धा एकरावर लागवड केली, तब्बल अडीच लाखांची कमाई झाली, पहा कसं होत नियोजन?

Beed Successful Farmer : मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागाचे नाव जेव्हा घेतलं जात तेव्हा डोळ्यापुढे भीषण दुष्काळाचे भयावय चित्र उभ राहतं. मराठवाड्यातील बीड जिल्हा तर दुष्काळासाठी संपूर्ण भारतवर्षात कुख्यात आहे. दुष्काळामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीमध्ये कायमच अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र ज्याला राजाचा दर्जा दिलेला आहे तो बळीराजा या दुष्काळाच्या संकटावर यशस्वी मात करत लाखो रुपयांची कमाई आता करत आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या शिंदेवाडी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवल आहे. दुष्काळी पट्टा असतानाही दोडका या भाजीपाला वर्गीय पिकाच्या शेतीतून या शिंदेवाडी येथील प्रयोगशील शेतकऱ्याने लाखोंची कमाई करून दाखवली आहे.

हे पण वाचा :- 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मृत झालेल्या लाभार्थ्याच्या कुटुंबाला मिळणार का? वाचा याविषयी सविस्तर

विशेष म्हणजे मात्र अर्धा गुंठे शेतजमिनीत अडीच लाखांची या शेतकऱ्याने कमाई केली आहे. परशुराम करे अस या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून सध्या परशुरामांची पंचक्रोशीत चर्चा पहावयास मिळत आहे. परशुराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या अर्ध्या गुंठे शेतजमिनीत युवरा 1212 या जातीच्या दोडक्याची लागवड केली.

लागवडीनंतर योग्य व्यवस्थापन केले. लागवडीसाठी जवळपास 20 हजाराचा खर्च त्यांना आला. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी दोडक्याची शेती केली. ठिबक, मल्चिंग पेपर यांसारख्या तंत्रज्ञानामुळे अर्धा गुंठे शेत जमिनीतूनच दोडक्याचे चांगले दर्जेदार उत्पादन त्यांना मिळाले.

हे पण वाचा :- पंजाबराव डख बोले तैसे ढग हाले ! सोशल मीडियावर चर्चा फक्त पंजाबरावांचीच….

मात्र तीन महिन्यात वीस गुंठ्यात आत्तापर्यंत त्यांनी चार टन दोडक्याचे उत्पादन मिळवले आहे.आणखी उत्पादन यातून मिळणार आहे. सध्या 50 ते 55 रुपये प्रति किलो अशा दरात दोडक्याची विक्री होत असून दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न यातून त्यांना मिळालं आहे. शिवाय आणखी उत्पादन मिळणार असल्याने कमाईचा आकडा वाढूही शकतो.

निश्चितच मराठवाड्यातील या शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे. दुष्काळी पट्टा म्हणून संपूर्ण देशभर ज्या बीड जिल्ह्याकडे पाहिलं जातं त्या बीड जिल्ह्यातून असा कौतुकास्पद प्रयोग समोर आल्याने या प्रयोगाच सर्वत्र कौतुकच केल जात आहे. 

हे पण वाचा :- पुण्याच्या उच्चशिक्षित शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ! ‘या’ वाणाच्या 225 सिताफळाच्या झाडातून मिळवलं साडेतीन लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe