Business Success Story:- व्यक्ती जेव्हा जीवन जगताना आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठरवतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे स्वतःला त्या दिशेने झोकुन देतो तेव्हा कालांतराने अशा व्यक्तींना अखंड मेहनत, सातत्य, ध्येय पूर्ण करण्याच्या वाटेमध्ये आलेले अनंत अडचणी व त्यांना तोंड देऊन काढलेला मार्ग अशा प्रकारच्या गुणांचा आधार घेऊन ध्येयापर्यंत म्हणजेच यशापर्यंत पोहोचतो.
हा जो काही मार्ग असतो तो नक्कीच सोपा नसतो. परंतु कष्टाच्या जोरावर असे अनेक व्यक्ती यशाला गवसनी घालतात व देशातच नाही तर पूर्ण जगात त्यांचे नाव होते. अशीच काहीशी यशोगाथा प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्टचे सीएमडी असलेली इरफान रझाक यांची सांगता येईल.
शिवणकाम करणारा टेलर ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इरफान रझाक यांची यशोगाथा
इरफान रजाक हे प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्टचे सीएमडी असून त्यांच्या या सगळ्या व्यवसायाची सुरुवात एका लहानशा सुरुवातीपासून झाली. इरफान रझाक यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर ती व्यावसायिक पार्श्वभूमी असलेली होती.
इरफान याचे वडील रझाक सत्तार यांनी 1950 मध्ये बेंगलोर मधील एका ठिकाणी एक छोटे कपड्यांचे आणि टेलरिंगचे दुकान केलेले होते व त्या माध्यमातूनच त्यांनी प्रेस्टिज ग्रुपची सुरुवात केलेली होती. इरफान यांचा जन्म देखील 1950 मध्ये बंगलोर येथे झाला. जेव्हा वडिलांनी शिवणकाम करीत असताना प्रेस्टीज कंपनीची सुरुवात केली होती.
याच कंपनीला इरफान यांनी नंतर खूप मेहनतीने मोठ्या प्रमाणात विस्तारली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये इरफान देखील त्यांच्या वडिलांसोबत शिवणकाम करायचे. त्यांना एका प्रोजेक्टने खूप मोठे यश संपादन करून दिले व यामुळेच त्यांच्या कुटुंबाची संपत्तीने $1 अब्ज रुपयांचा टप्पा गाठला व येथूनच या कंपनीची खरी प्रगती सुरू झाली.
त्यानंतर त्यांच्या प्रेस्टीज इस्टेट प्रोजेक्टच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांनी वाढ झाली. त्यांच्या या कंपनीने रियल इस्टेट क्षेत्रामध्ये अनेक निवासी, व्यावसायिक तसेच हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य विभागामध्ये 285 प्रकल्प पूर्ण करण्याची मजल गाठली व कंपनीचे 54 प्रकल्प सध्या सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये 7.5 कोटी स्क्वेअर फुटाचे बांधकाम होणार आहे.
या क्षेत्रातील डीएलएफ या प्रसिद्ध कंपनीनंतर इरफान यांची प्रेस्टीज कंपनी भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध प्रॉपर्टी फर्म म्हणून ओळखली जाते.
यश संपादन केल्यानंतर देखील सुरू आहे त्यांचे टेलरिंगचे दुकान
इरफान यांचे लहान बंधू रिजवान आणि नोमान यांचे देखील या व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचे योगदान असून रजाक कुटुंबामध्येच मुळात उद्योजकतेची भावना रुजलेली आहे. रिअल इस्टेट सोबतच त्यांचे फॅब्रिक आणि टेलरिंगचे दुकान आजतागायत सुरू आहे व इतकेच नाहीतर ते व्यावसायिक तर आहेतच
परंतु खेळाची आवड देखील आज जपतात. एक लहान कपड्यांचे दुकान ते अब्जावधी डॉलरचे असलेले रियल इस्टेट साम्राज्य इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास परिश्रमाने आणि पूर्णतः जिद्दीने भरलेला आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश
जर आपण इरफान रझाक यांची एकूण संपत्ती पाहिली तर ती 2024 पर्यंत $1.3 अब्जपर्यंत झालेली आहे व भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी ते ओळखले जातात. त्यांचा प्रेस्टीज इस्टेट प्रकल्प आज देखील भविष्यकाळातील विकास आणि नावीन्यतेसाठी पूर्णपणे तयार आहे.
फोरब्स च्या 2024 च्या जागतिक अब्जाधिशाच्या यादीमध्ये 200 इतर भारतीयांसह त्यांचा देखील समावेश करण्यात आलेला होता. वर्ष 2013 मध्ये 12930 कोटी रुपयांची विक्री त्यांच्या या प्रोजेक्ट्सने नोंदवलेली होती.
त्यांच्या या प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्टचा बेंगलोर मध्येच नाही तर चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, मुंबई यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. आज आपण प्रेस्टीज प्रॉपर्टी चे ग्राहक पाहिले तर यामध्ये कॅटरपिलर, ॲपल तसेच अरमानी सारख्या जागतिक ब्रँडचा देखील समावेश आहे.