Business Success Story:- कॉलेज जीवनामध्ये शिकत असताना बहुसंख्य तरुण हे फक्त कॉलेज, अभ्यास आणि इतर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त करून लक्ष देत असतात व 22 किंवा 25 वर्ष वयोगट हा बहुसंख्य पद्धतीने जीवनातील असंख्य प्रकारच्या मौज मजेकडे कल असणारा असतो. या कालावधीमध्ये भविष्यातील करिअर सेट करण्यासाठी शिक्षण वगैरे घेतले जाते किंवा त्या दृष्टीने फक्त प्लॅनिंग केल्या जातात.
परंतु या वयामध्ये एखादा स्टार्टअप सुरू करावा आणि तो मोठ्या प्रमाणावर वाढवावा असा विचार बऱ्याच कमी प्रमाणात तरुणांच्या मनामध्ये येत असेल. परंतु या तरुणाईच्या मनस्थितीला मात्र अनुभव दुबे आणि आनंद नायक हे दोन मित्र मात्र अपवाद ठरले. 2016 यावर्षी जेव्हा हे दोघे मित्र भेटले तेव्हा ते वयाने 22 ते 23 वर्षाचे होते.
यादरम्यान अभ्यासाच्या कालावधीत हे दोघ मित्र भेटले व त्यांची त्या ठिकाणी मैत्री झाली. या दोघांपैकी आनंद नायक यांनी इंदूरमध्ये एक छोटासा कपड्यांचा व्यवसाय सुरू केलेला होता व त्याला कुटुंबाकडून दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले होते. साधारणपणे चार वर्षे आनंदने हा व्यवसाय केला. परंतु काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने कुठलातरी नवीन व्यवसायाच्या शोधात आनंद होता व त्यांना यामध्ये दिसून आले की चहाचे मार्केट मोठे असल्याने या व्यवसायामध्ये चांगली संधी आहे व हायजेनिक चहा सध्या कुठेच मिळत नाही.
त्या दृष्टिकोनातून चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय आनंदने केला व याबाबतची माहिती अनुभव दुबे ला फोन करून दिली. त्यानंतर दोघे मिळून त्यांनी इंदोर येथे चहाच्या व्यवसायाला सुरुवात केली. भांडवल म्हणून आनंदाने कपड्यांचे व्यवसायामध्ये तीन लाख रुपये कमावलेले होते व ते सर्व पैसे त्यांनी चहा सुट्टा बार या व्यवसायामध्ये गुंतवले.
चाय सुत्ता बार हे नाव ठेवण्यामागे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते की काहीतरी युनिक नाव असावे की जे लोकांमध्ये कायम लक्षात राहील व लोकांमध्ये उत्साह निर्माण करेल. साधारणपणे हा एक पब्लिसिटी स्टंट होता. मात्र हा स्टंट त्यांचा चांगला चालला व त्यांचा हा व्यवसाय दीडशे कोटींपर्यंत पोहोचलेला आहे.
देशात चाय सट्टा बारचे आहेत 500 पेक्षा जास्त स्टोअर्स
अनेक प्रकारचा संघर्ष करत या दोघा मित्रांनी या स्टार्टअपची उलाढाल झपाट्याने वाढवली व विस्तार देखील मोठ्या प्रमाणात केला. सध्या त्यांच्या या चाय सुट्टा बारची 500 पेक्षा जास्त दुकाने असून सगळ्यांच्या माध्यमातून जवळपास 150 कोटींचा टर्नओव्हर त्यांचा झालेला आहे. या स्टार्टअपचा स्वतःचा व्यवसाय आहे परंतु त्यांनी फ्रेंचाईसी बिझनेस मॉडेल देखील राबवली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय भारतातच नाही तर दुबई, कॅनडा, नेपाळ, युके आणि लंडन पर्यंत पोहोचलेला आहे.
चाय सुट्टा बार आहे जगातील सर्वात मोठी कुल्हार(कुल्हड) चहा विकणारी कंपनी
चाय सुट्टा बारच्या माध्यमातून कुल्हडमध्ये चहा विकायला सुरुवात केली. त्यावेळी मात्र ही एक कल्पना खूप अनोखी होती. आज ही कंपनी प्रत्येक दिवसाला पाच लाख कुल्हड चहा विकते. या कंपनीचा दररोज दुधाचा वापर पाहिला तर तो 20000 लिटर पेक्षा जास्त आहे. आता त्यांच्या या स्टार्ट अपने 1500 कुटुंबांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे. या दोघाही मित्रांनी त्यांच्या कंपनीमध्ये आणि गरिबांना आणि अपंगांना नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे.
चाय सुट्टा बार या चार प्रकारे कमावते पैसा
हा स्टार्टअप चार प्रकारे पैसे कमवतो. यातील पहिला मार्ग म्हणजे चहा विकून पैसा कमावणे हा आहे. चाय सुट्टा बारमध्ये तुम्हाला चॉकलेट, आले, वेलची, मसाला तसेच पान व तुळस इत्यादी विविध फ्लेवरचा चहा मिळतो. जेव्हा त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा चहाची किंमत सात रुपये होती तर आत्ता चहाची किंमत 15 ते 35 रुपये दरम्यान आहे. त्यांच्या मते चहाचे व्यवसायामध्ये पन्नास ते साठ टक्के मार्जिन असते.
त्यांची ही कंपनी दुकानांमध्ये फक्त चहा विकत नाही तर आता ते बर्गर, पास्ता, मॅगी तसेच मोमो, पिझ्झा, सॅंडविच इत्यादी वस्तूंची विक्री देखील करते. पैसा कमावण्याचा या कंपनीचा दुसरा मार्ग म्हणजे फ्रेंचाईसी होय व या माध्यमातून त्यांना फ्रेंचाईसी फी मिळते आणि तिसरा मार्ग म्हणजे रॉयल्टी फी ही होय.
चाय सुट्टा बार घेणाऱ्या फ्रॅंचाईजीने दोन टक्के म्हणून भरावे लागते व हे चाय सुट्टा बार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत घडते. तसेच या कंपनीचा पैसे कमावण्याचा चौथा मार्ग म्हणजे या कंपनीचे कुल्हड सारखे उत्पादने हे होय.
अनुभव दुबे आणि आनंद नायक यांनी अनेक आव्हानांचा केला सामना
ही व्य्यवसाय सुरू करताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व अनेक आवाहन देखील यामध्ये येतात. त्याप्रमाणे या दोघा मित्रांना देखील या व्यवसायामध्ये अनेक आव्हाने आली. त्यांच्यापुढे सर्वात पहिले आव्हान होते ते पैशांचे व त्यांच्याकडे पैशांचा पुरवठा खूप कमी होता. तसेच हा व्यवसायासाठी त्यांना कुटुंबाकडून फारसा पाठिंबा मिळत नव्हता.
या व्यवसायामध्ये यांना कितपत यश मिळेल किंवा यांची भविष्य कसे असेल अशा पद्धतीची भीती त्यांच्या पालकांना होती. याबाबत आनंद नायक सांगतो की, त्यांच्या पहिल्या स्टॉलचे भाडे 25 हजार रुपये होते व तेव्हा घरातील लोक म्हणायचे की प्रत्येकी दहा रुपयांना चहा विकून तुम्ही किती पैसे कमावणार? मात्र अशातही त्यांनी हा व्यवसाय सुरू केला व कुटुंबाकडून नंतर त्यांना पाठिंबा मिळायला लागला.
तसेच समाजातील काही नेते तसेच गुंड यांचा देखील त्रास त्यांना झाला. परंतु त्यांनी हे सगळं व्यवस्थित आणि शांततेने हाताळले व व्यवसाय पुढे सुरू ठेवला. त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांचे ग्राहक हे प्रामुख्याने विद्यार्थी होते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्यांनी व्यवसायाचे सगळे व्यवस्थापन केले.
आता या दोघे मित्रांनी त्यांच्या या व्यवसायाची वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले असून येणाऱ्या कालावधीत त्यांची ही कंपनी काही उत्पादने लॉन्च करण्याची तयारी देखील आहे. त्याच्या बाजारपेठेत या कंपनीने मजबूत अशी पकड निर्माण केली आहे व पुढे त्यांच्या या चाय सुटा बार कंपनीला कॉफी मार्केटमध्ये उतरायचे आहे.