केळी पिकामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 ते 40 टन केळीचे उत्पादन; मिळवला एकरी 10 लाखांचा नफा

धैर्यशील राव यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेऊन केळी विदेशात निर्यात केली व त्या माध्यमातून एकरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.दोन्ही तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एका एकरमध्ये 35 ते 40 टन विक्रमी उत्पादन मिळवण्यात देखील त्यांना यश आले आहे.

Ajay Patil
Published:
banana crop

Farmer Success Story: ज्याप्रमाणे आता तंत्रज्ञानाचा वापर जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे.त्याप्रमाणे तो आता कृषी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून अनेक शेतकरी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत कमी क्षेत्रात भरघोस असे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेताना आपल्याला दिसून येत आहेत.

अगोदरची शेतीची पारंपारिक पद्धत तसेच पारंपारिक पिकांची लागवड आता मागे पडली असून त्याची जागा आता तंत्रज्ञानाने आणि विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिके व विविध प्रकारचे फळबागा तसेच मसाल्याचे पदार्थ व फुलशेतीने घेतली आहे.

तंत्रज्ञानाच्या वापराने भरघोस उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना शक्य झाल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून शेतकरी आता समृद्ध होतांना दिसून येत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण आष्टा येथील प्रयोगशील शेतकरी धैर्यशील झुंजारराव शिंदे यांची शेती पाहिली तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर कशा पद्धतीने करावा लागतो व त्या माध्यमातून कसे उत्पादन मिळते? याचे ज्वलंत उदाहरण आहे.

धैर्यशील राव यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचे दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन घेऊन केळी विदेशात निर्यात केली व त्या माध्यमातून एकरी दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.दोन्ही तंत्रज्ञानाच्या वापरामुळे एका एकरमध्ये 35 ते 40 टन विक्रमी उत्पादन मिळवण्यात देखील त्यांना यश आले आहे.

 केळी पिकाचे घेतले एकरी 35 ते 40 टन उत्पादन

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आष्टा  येथील राजकारण व समाजकारणात स्वतःच्या ठसा उमटवलेले आणि शेतीमध्ये प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेले धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून केळीचे दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेऊन विदेशात केळी निर्यात केली असून एकरी 35 ते 40 टन विक्रमी उत्पादन देखील घेतले आहे.

त्यांनी पिकवलेल्या दर्जेदार केळीला पंचवीस हजार रुपये प्रति टन असा दर मिळाला असून इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी असे उदाहरण त्यांनी समोर ठेवले आहे. धैर्यशील राव यांच्याकडे एकूण 24 एकर जमीन असून संपूर्ण बागायती जमीन आहे. यापैकी 20 एकर क्षेत्रावर ते ऊस पिकं घेतात व उरलेल्या क्षेत्रावर त्यांनी सहा महिन्यांच्या टप्प्याने केळीची लागवड केली आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून त्यांनी जी नाईन केळीची रोपे आणून त्याची सहा बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. खत आणि पाणी व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करता यावे याकरिता ठिबकचा वापर केला. विशेष म्हणजे त्यांनी ठिबकने खत व पाणी देता यावे याकरिता विहिरीवर ऑटोमायझेशन सिस्टम बसवली आहे.

इतकेच नाही तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान व त्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे देखील म्हणतो. या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला असून त्यामुळे त्यांना हवामान तसेच जमिनीचे गुणधर्म पाहून रासायनिक खते तसेच पाण्याची असणारी गरज,

किड व रोगाच्या प्रादुर्भावाची सूचना मिळणे  इत्यादी गोष्टींचा फायदा झाला व त्याप्रमाणे केळी पिकाचे नियोजन करण्यात मदत झाल्याने उत्पादनात वाढ झाली. तसेच सेंद्रिय पद्धतीचा बऱ्याच प्रमाणे वापर त्यांनी केला व यामध्ये त्यांनी जीवामृत केळीसाठी वापरले. जीवामृत तयार करून ते ठिबकच्या माध्यमातून केळी पिकाला देत असतात.

 शिंदे यांनी या देशांना केली केळीची निर्यात

धैर्यशील शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार केळीचे उत्पादन घेतले व त्यांनी लागवड केलेल्या दोन एकर मधील केळीची निर्यात त्यांनी ओमान, दुबई आणि इराण या देशांना केली आहे.

इतकेच  नाहीतर बांधावर देखील त्यांच्या केळीला चांगला दर मिळाल्याने खूप मोठा फायदा झाला. तसेच नुकताच पार पडलेल्या नवरात्री उत्सव आणि आता येणाऱ्या सणासुदीच्या कालावधीमुळे आष्टा आणि परिसरात असलेल्या बाजारपेठेत देखील चांगला दर मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe