Car Insurance:- कार इन्शुरन्स ही आर्थिक संकल्पना कारच्या सुरक्षितता आणि लागणारा देखभाल खर्चाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून कार इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप फायदेशीर असते.
कारण कार म्हटले म्हणजे हे रस्त्यावर चालणारे वाहन असल्यामुळे केव्हा कोणती घटना घडेल आणि यामध्ये कारचे कोणत्या प्रकारचे नुकसान होईल? याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही.

त्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या मोठ्या खर्चापासून वाचण्यासाठी कार इन्शुरन्स फायद्याचा ठरतो हे आपल्याला माहिती आहे. परंतु बऱ्याचदा कार इन्शुरन्स पॉलिसी आपण घेतो व तरी देखील विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम द्यायला नकार दिला जातो.
जेव्हा अशी वेळ येते तेव्हा मात्र मेन्टेनन्सचा संपूर्ण खर्च आपल्याला स्वतःच्या खिशातून करावा लागतो. याकरिता तुम्ही जेव्हाही कार इन्शुरन्स घ्याल तेव्हा तुम्ही त्यासोबत ॲड ऑन कव्हर्स घेणेदेखील तितकेच गरजेचे असते. त्यामुळे कोणते ॲड ऑन कव्हर्स हे कार इन्शुरन्स घेताना फायद्याचे ठरतात व नाही घेतले तर काय नुकसान होऊ शकते? याबद्दलची माहिती बघू.
कार इन्शुरन्स घेताना घ्या हे ॲड ऑन कव्हर्स
1- नो क्लॅम बोनस अर्थात एनसीबी ऍड ऑन प्लॅन– एनसीबी अर्थात नो क्लेम बोनस हा एक महत्त्वाचा ऍड ऑन प्लान असून जेव्हा कार क्लेम घेतला जातो तेव्हा नो क्लेम बोनस पूर्णपणे संपतो. अशा परिस्थितीत तुम्हाला पुढच्या वर्षापासून प्रीमियम करिता जास्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु तुम्ही जर हा ऍड ऑन प्लान घेतला असेल तर मात्र तुम्ही एका वर्षात एक क्लेम घेऊ शकता आणि तुमचा नो क्लेम बोनस देखील संपत नाही व अशा पद्धतीने तुम्ही अतिरिक्त म्हणजे जास्तीचा प्रीमियम भरण्यापासून वाचू शकतात.
2- वैयक्तिक वस्तूंचे नुकसान– आपल्याला माहिती आहे की,बऱ्याचदा आपण कारमध्ये अनेक मौल्यवान वस्तू ठेवलेले असतात आणि अशा वस्तू बऱ्याचदा चोरीला जातात. अशाप्रसंगी जर तुमच्याकडे या पद्धतीचा ऍड ऑन प्लॅन नसेल तर मात्र तुम्हाला कंपनीकडून एक रुपया देखील मिळत नाही.
यामध्ये लक्षात घ्यावे की या प्लानमध्ये कंपनीकडून फक्त मोबाईल आणि लॅपटॉप कव्हर केले जाते. रक्कम किंवा दागिन्यांचा यामध्ये समावेश होत नाही. या ॲड ऑन प्लान अंतर्गत जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपचे बिल तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही दाखवाल तरच ते पैसे देखील मिळतात.
3- इंजिन संरक्षण म्हणजेच इंजिन प्रोटेक्ट– हा देखील एक महत्त्वाचा एड ऑन प्लान असून मूळ कार इन्शुरन्समध्ये इंजिनचा समाविष्ट केलेला नसतो व त्याकरिता कारच्या इंजिनच्या संरक्षणासाठी स्वतंत्र इंजिन संरक्षण योजना विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली जाते.
त्यामुळे तुम्ही ही योजना म्हणजेच हा ॲड ऑन प्लान घेणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही जर हा प्लान घेतला नाही तर कंपनीकडून दाव्याचे पैसे मिळत नाहीत.
4- कन्सुमेबल कव्हर्स– जेव्हा कार क्लेमसाठी जाते तेव्हा काही खर्च करणे गरजेचे असते व याकरिता कंपनी पैसे देत नाही. या कामांमध्ये वॉशर, ग्रीस तसेच इंजिन ऑइल,
स्क्रू आणि ऑइल फिल्टर इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. तुम्ही कंजूमेबल कव्हर्स घेतला असेल तर याचा खर्च देखील कंपनीच्या माध्यमातून दिला जातो. परंतु हा ऍड ऑन प्लॅन पाच वर्षापेक्षा जुन्या कारसाठी उपलब्ध नाही.
5- टायरच्या बाबतीत– इन्शुरन्स कंपनीकडे टायर संरक्षणासाठी देखील ॲड ऑन प्लान आहेत. यामध्ये तुमच्या कारचे टायर फुटले किंवा कट झाल्यास तुम्हाला नवीन टायर मिळते.
या टायर साठी तुम्हाला एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचा प्लान घेतला नसेल तर मात्र टायरसाठी कंपनी एक रुपया देखील देत नाही.