Car Loan Tips:- प्रत्येकाला आपल्या घरासमोर चारचाकी असावी असे स्वप्न असते. साधारणपणे आताच्या तरुण पिढीचा विचार केला तर जॉब लागल्यानंतर काही दिवसांनी बरेचजणांचे एखाद्या शहरात स्वतःचे घर आणि कार या दोन गोष्टी असाव्यात अशी स्वप्न असल्याचे आपल्याला दिसून येते.
तसे पाहायला गेले तर नवीन कार घेणे किंवा नवीन घर घेणे हे आता मिळणाऱ्या कर्जामुळे खूप सोपे झालेले आहे. कारण बऱ्याच बँकांच्या माध्यमातून होमलोन आणि कारलोन देण्याच्या प्रक्रिया अत्यंत सोप्या झाल्यामुळे दोन्ही स्वप्न पूर्ण करता येणे आता शक्य झाले आहे. परंतु कर्ज घेतले म्हणजे ते आपल्याला फेडावेच लागते आणि याकरता आपल्याला दिवस-रात्र मेहनत करून त्याचा महिन्याचा जो काही हप्ता येईल तो वेळेवर भरणे गरजेचे असते.

त्यामुळे अशा हप्त्यांमुळे बऱ्याचदा आपली आर्थिक ओढाताण होऊ शकते. अशा पद्धतीची आर्थिक ओढाताण होऊ नये याकरता आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे व हीच बाब कार लोन घेण्याच्या अगोदर देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
कार खरेदी करावी परंतु किमतीचा विचार करा
आज जर आपण कार बाजारपेठेचा मागोवा घेतला तर आपल्याला महागड्या कार दिसून येतात व यामध्ये आपला आर्थिक बजेट पण योग्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा कारची निवड करणे देखील महत्त्वाचे असते. याकरिता तुम्ही कोणती कार खरेदी करू शकतात हे तुम्हाला समजणे खूप गरजेचे आहे. साधारणपणे यामध्ये जर एक गणित पाहिले तर तुमचा वर्षाचा पगार जितका आहे
त्या पगाराच्या अर्ध्या किमती पेक्षा कमी रकमेची कार खरेदी करणे तुमच्या फायद्याचे ठरेल. उदाहरण घ्यायचे झाले तर तुमचे वर्षाची पगार जर सात लाख रुपये असेल तर तुम्ही साडेतीन लाख रुपये किमतीची कार खरेदी करणे फायद्याचे ठरेल. नाहीतर तुमचे आर्थिक गणित बिघडले समजा. त्यामुळे तुमचा पगार किती आहे? या गोष्टीचा विचार करणे खूप गरजेचे आहे.
म्हणजे जेव्हा तुमचा पगार तुमची कार घेत आहात तिच्या किमतीपेक्षा दुप्पट होईल तेव्हा तुम्ही आरामात कार लोन घ्या. कारण कार लोन घेतले म्हणजे तुम्हाला ईएमआय भरणे गरजेचे राहील. त्यामुळे तुमच्या सगळ्या आर्थिक गरजा लक्षात घेऊनच तुम्ही त्याबाबतचा निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.
कार खरेदीसाठी वापरा 20-4-10 चा फॉर्मुला
तुम्ही जर कार खरेदी करताना हा फार्मूला वापरला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यामध्ये जर तुम्ही वीस या अंकाचा अर्थ पाहिला तर तुम्ही कार खरेदी करताना डाऊन पेमेंट म्हणून 20% रक्कम देणे गरजेचे आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे यातील चार या अंकाचा विचार केला तर तुमच्या कार लोनचा कालावधी हा चार वर्षापेक्षा जास्त नसावा आणि दहा या अंकाचा अर्थ पाहिला तर तुमचा कार लोनचा ईएमआय हा तुमच्या पगाराच्या दहाव्या भागापेक्षा अधिक नसावा.
त्यामुळे या सूत्रानुसार जर तुम्ही सगळा आर्थिक बजेट बनवला व कार खरेदी केली तर तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. तसेच तुम्ही जितके डाऊन पेमेंट जास्त कराल तितकाच तुम्हाला महिन्याला हप्ता कमी भरावा लागेल. तसेच कार खरेदी करताना तुमच्या सगळ्या आवश्यक गरजा ओळखून तुम्ही कारची निवड करावी. उगीचच लेटेस्ट मॉडेलच्या फंदात पडू नये.