Cibil Score: तुम्ही देखील सिबिल स्कोर वारंवार तपासतात का? काय आहे सिबिलच्या बाबतीत हार्ड आणि सॉफ्ट इंक्वायरी? वाचा माहिती

300 ते 900 च्या दरम्यान हा स्कोर असतो व यामध्ये 750 च्या पुढे सिबिल स्कोर असणे उत्तम मानले जाते. सिबिल स्कोर कमी होण्यामागे घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड न करणे हे प्रमुख कारण असते व त्यासोबतच जर सिबिल स्कोर सारखा सारखा तपासला तर कमी होतो असे देखील म्हटले जाते. परंतु हे खरे आहे का?

Ajay Patil
Published:
cibil score

Cibil Score:- आपल्याला अचानकपणे पैशांची गरज जेव्हा भासते तेव्हा आपण बँकांच्या माध्यमातून किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घ्यायला जातो व कर्जासाठी अर्ज करतो. परंतु आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीने कर्ज घ्यायला जातो तेव्हा बँक किंवा एनबीएफसी यांच्या माध्यमातून सगळ्यात आधी सिबिल स्कोर तपासला जातो.

सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला ताबडतोब कर्ज मिळू शकते. परंतु सिबिल स्कोर जर कमी असेल तर मात्र कर्ज मिळण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात किंवा कर्ज नाकारले देखील जाऊ शकते. आपल्याला माहित आहे की सिबिल स्कोर ही एक तीन अंकी संख्या असते व माध्यमातून बँकांना आपला क्रेडिट इतिहास किंवा क्रेडिट पात्रता कळत असते.

300 ते 900 च्या दरम्यान हा स्कोर असतो व यामध्ये 750 च्या पुढे सिबिल स्कोर असणे उत्तम मानले जाते. सिबिल स्कोर कमी होण्यामागे घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड न करणे हे प्रमुख कारण असते व त्यासोबतच जर सिबिल स्कोर सारखा सारखा तपासला तर कमी होतो असे देखील म्हटले जाते. परंतु हे खरे आहे का? याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

 सिबिल स्कोर सारखा तपासल्याने कमी होतो का?

सिबिल स्कोर ही एक तीन अंकी संख्या असते व या संख्येच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचा क्रेडिट इतिहास आणि क्रेडिट पात्रता कळत असते. साधारणपणे सिबिल स्कोर 300 ते 900 या अंकाच्या दरम्यान गणला जातो व यामध्ये साडेसातशे किंवा त्यापेक्षा जास्त स्कोर असेल तर तो उत्तम मानला जातो.

हा सिबिल स्कोर कमी होण्यामागे सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड न करणे हे होय. याव्यतिरिक्त इतर अनेक घटक देखील स्कोर वर परिणाम करत असतात. यामध्ये जर आपण सिबिल स्कोर सारखा तपासत असाल तर यामुळे देखील सिबिल स्कोर कमी होऊ शकतो.

परंतु या मागील सत्य परिस्थिती काय आहे हे देखील आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर हार्ड इंक्वायरी आणि सॉफ्ट इंक्वायरी कशाला म्हणतात हे समजून घ्यावे लागेल. यामध्ये सॉफ्ट इंक्वायरी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा सिबिल स्कोर स्वतः तपासतात तेव्हा त्याला सॉफ्ट इंक्वायरी असे म्हटले जाते.

जर अशा पद्धतीने सॉफ्ट इंक्वायरी करत असाल तर त्याचा तुमच्या सिबिल स्कोर वर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. परंतु जर एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट स्कोर तपासत असेल तेव्हा त्याला हार्ड इन्क्वायरी असे म्हटले जाते. अशा हार्ड इन्क्वायरी मुळे मात्र तुमचा सिबिल स्कोर काही अंकांनी कमी होण्याची शक्यता असते.

 आरबीआय ने लागू केले नवीन नियम

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आता काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत व या नवीन नियमानुसार आता हार्ड इंक्वायरी प्रक्रियेमध्ये देखील बदल करण्यात आलेले आहे. समजा एखादी बँक किंवा वित्तीय संस्था तुमचा क्रेडिट इतिहास सारखा तपासत असेल व त्याचा तुमच्या सिबिल स्कोरवर पूर्वीपेक्षा जास्त परिणाम होण्याची आता शक्यता आहे.

कारण बऱ्याच लोकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी परत परत अर्ज करण्याची सवय असते व अशा लोकांकरिता हा नियम विशेष महत्त्वाचा आहे. तुम्ही जर कमी कालावधीत अनेक वेळा कर्जासाठी अर्ज केला, कर्जाची वेळेवर परतफेड न करणाऱ्या व्यक्तीला जामीनदार झालात किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर केले नाही तर यामुळे सिबिल स्कोर कमी होतो.

त्यामुळे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड करिता वारंवार अर्ज करू नका. कारण तुम्ही जेव्हा जेव्हा अर्ज करता तेव्हा प्रत्येक अर्जावर तुमच्या क्रेडिट स्कोरची चौकशी होते व यामुळे तुमचा सिबिल स्कोर घसरू शकतो.

तुम्हाला जर तुमचा क्रेडिट स्कोर तपासायचा असेल तर तुम्ही सिबिलची अधिकृत वेबसाईट किंवा रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या द्वारे मान्यता प्राप्त संस्थेच्या वेबसाईटचा वापर करून तपासू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe