CISF Recruitment:- केंद्र आणि राज्य सरकारांच्या इतर विभागांप्रमाणेच आता संरक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत व यासाठी लष्करापासून तर निमलष्करी दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रियेच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. याच पद्धतीने जर आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफच्या दृष्टिकोनातून बघितले तर सीआयएसएफमध्ये देखील आता कॉन्स्टेबल फायरमन पदांची भरती केली जाणार असून त्यासंबंधीची अधिकृत अधिसूचना 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार 30 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
सीआयएसएफ मध्ये होणार 1130 पदांसाठी भरती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफमध्ये कॉन्स्टेबल फायरमन पदांच्या 1130 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली असून 21 ऑगस्ट 2024 रोजी यासंबंधीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भरतीसाठी जे काही इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील त्यांना 30 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
प्रवर्गनिहाय फायरमन पदाच्या रिक्त जागांचा तपशील
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 1130 रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रवर्गनिहाय रिक्त पदे पाहिली तर यामध्ये…
सामान्य प्रवर्गाच्या एकूण रिक्त जागा 466, आर्थिक दृष्ट्या असक्षम म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गाच्या एकूण रिक्त जागा 114, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या एकूण रिक्त जागा 153, एसटी प्रवर्गाच्या एकूण रिक्त जागा 161 आणि इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी साठीच्या एकूण रिक्त जागा 236 इतके आहेत. अशा पद्धतीने सर्व प्रवर्ग मिळून एकूण रिक्त जागा या 1130 आहेत.
सीआयएसएफ कॉन्स्टेबल फायरमन भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
केंद्रीय सुरक्षा दल अर्थात सीएसएफच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल फायरमन पदांच्या रिक्त जागा भरतीसाठी शैक्षणिक पात्रता बघितली तर उमेदवार हे भारतातील कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डातून इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेले असावेत.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
केंद्रीय सुरक्षा दल अर्थ सीएसएफमध्ये जे इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करतील त्यांच्या करिता वयोमर्यादा ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 18 ते 23 वर्ष दरम्यान निश्चित करण्यात आलेली असून सरकारी नियमानुसार प्रवर्गनिहाय वयामध्ये शिथिलता लागू करण्यात आलेली आहे.
कशा पद्धतीने केली जाईल निवड?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफमध्ये राबविण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल फायरमन पदाच्या भरती करिता निवड करताना उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी तसेच कागदपत्रांची पडताळणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय तपासणी अर्थात मेडिकल इत्यादी टप्पे पार करावे लागणार आहेत.
या भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी व त्यासोबतच एससी/ एसटी आणि पीओडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
केंद्रीय सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफ मध्ये राबवण्यात येणाऱ्या कॉन्स्टेबल फायरमन पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता भरती जाहीर करण्यात आलेली आहे व यासाठी उमेदवारांना 30 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करता येणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
( टीप- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी राज्यानुसार असलेल्या रिक्त जागांचा तपशील व इतर आवश्यक निकष समजून घेण्याकरिता या भरतीची अधिकृत अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. तसेच या भरतीसाठीची परीक्षेची तारीख आणि प्रवेश पत्र कधी येईल याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.