12 वी आर्ट्समध्ये पूर्ण करा आणि ‘हे’ टॉप असे करिअर ऑप्शन निवडा! मिळेल चांगली नोकरी आणि भविष्य राहील उज्वल

बरेच विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स तसेच कॉमर्स इत्यादी शाखांमधून बारावी पूर्ण करण्याचा असतो. कारण तुम्ही जर वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली आणि उत्तीर्ण झाला तर तुम्हाला महत्त्वाच्या अशा आणि भविष्यातील नोकरीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.

Ajay Patil
Published:
career tips

Career Tips: दहावी आणि बारावी या दोन्ही शैक्षणिक वर्षांना विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व असून त्यातल्या त्यात बारावी या वर्षाला आयुष्याचा टर्निंग पॉईंट असे म्हटले जाते. कारण करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे काही अभ्यासक्रम आहेत ते प्रामुख्याने बारावीनंतरच करता येणे शक्य होते.

आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, बरेच विद्यार्थ्यांचा कल हा सायन्स तसेच कॉमर्स इत्यादी शाखांमधून बारावी पूर्ण करण्याचा असतो. कारण तुम्ही जर वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली आणि उत्तीर्ण झाला तर तुम्हाला महत्त्वाच्या अशा आणि भविष्यातील नोकरीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या दोन्ही शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो. परंतु मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कला शाखेत म्हणजेच आर्ट्स मध्ये देखील बारावी पूर्ण करतात.

परंतु बऱ्याचदा असं म्हणतात की कला शाखेत म्हणजेच आर्ट्समध्ये बारावी पूर्ण केली किंवा शिक्षण घेतले तर नोकरीच्या दृष्टिकोनातून तितकेसे महत्त्व नसते.

परंतु खरे जर पाहायला गेले तर आर्ट्समध्ये बारावी करून देखील असे अनेक पर्याय आहेत की ज्या माध्यमातून करिअर चांगल्या पद्धतीने सेट करता येऊ शकते व चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देखील मिळू शकतात. त्यामुळे आपण या लेखात बारावी आर्ट्स केल्यानंतर चांगले करिअर ऑप्शन कोणते? याबद्दलची माहिती बघू.

 बारावी आर्ट्स नंतर टॉपचे करिअर ऑप्शन

1- बीए इन सोशिओलॉजी बारावी कला शाखेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही बीए इन सोशियोलॉजी हा पर्याय निवडू शकतात. बऱ्याच विद्यापीठांमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिला जातो. बारावीनंतर जर सोशियोलॉजी मधून बीए कम्प्लीट केले तर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी करून शिक्षक होता येते.

2- बीए इन इकॉनॉमिक्स बारावीनंतर अर्थशास्त्र हा विषय घेऊन जर पदवी संपादन केली तरी हा एक चांगला ऑप्शन आहे. बीए इन इकॉनॉमिक्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी, एमबीए करता येते किंवा स्वतःचा एखादा स्टार्टअप सुरू करण्यास देखील खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते.

3- बीए इन इंग्लिश बारावीनंतर जर इंग्लिश विषय घेऊन पदवी संपादन केली म्हणजेच बीए इन इंग्लिश पूर्ण केले तर हा पर्याय खूप फायद्याचा आहे. बीए पूर्ण केल्यानंतर जर इंग्लिश विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतले तर असिस्टंट प्रोफेसरची नोकरी आरामात मिळू शकते.

4- इव्हेंट मॅनेजमेंट सध्याच्या कालावधीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये जेव्हा विद्यार्थी शिक्षण घेत असतात तेव्हा विद्यार्थ्यांना वेडिंग प्लॅनर आणि इव्हेंट मॅनेजर संबंधितल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात व या माध्यमातून नोकरी तर मिळतेच परंतु स्वतःचा व्यवसाय उभारून देखील लाखो रुपये भविष्यात विद्यार्थ्यांना कमावता येऊ शकतात.

5- बॅचलर ऑफ मास मीडिया बारावी आर्ट्स नंतर बॅचलर ऑफ मास मीडिया हा एक उत्तम पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये जर मास्टर डिग्री घेतली तर एखाद्या जाहिरात कंपनीत किंवा पत्रकारितेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होते.

6- बॅचलर इन फॅशन डिझाईनिंग बारावी आर्ट्स केल्यानंतर बॅचलर इन फॅशन डिझायनिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. बऱ्याच कॉलेजमध्ये सध्या हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. डिझायनिंग क्षेत्रामध्ये किंवा फॅशन उद्योगाशी संबंधित क्षेत्रात खूप मोठ्या पगाराची नोकरी या माध्यमातून मिळू शकते.

7- स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी बारावी आर्ट्स शाखेत पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सोपे जाते.

8- एमबीए बारावी आर्ट्स नंतर बीए पूर्ण करून एमबीएला ऍडमिशन घेता येऊ शकते. बीए पूर्ण केल्यानंतर एमबीए अभ्यासक्रम वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध असून याकरिता आवश्यक असलेली क्लेटची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येऊ शकते.

9- बीए एलएलबी बारावी आर्टचे विद्यार्थी बीए एलएलबीचे शिक्षण देखील घेऊ शकतात. एलएलबी पूर्ण केल्यानंतर वकिलीची नोकरी मिळण्याची किंवा स्वतः प्रॅक्टिस करण्याची संधी मिळते. देशातील बऱ्याच विद्यापीठात बीए एलएलबीचे कोर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा देखील एक चांगला ऑप्शन विद्यार्थ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe