सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका ! जुलै ते डिसेंबर 2025 या काळात महागाई भत्ता (DA) फक्त ‘इतका’ वाढणार !

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आठवावेतन आयोगाची घोषणा केली आहे. आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्यात आला आहे.

Published on -

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळाली. खरे तर नवीन वर्षाचे पहिले तीन महिने सरकारी कर्मचाऱ्यांचेच राहिलेत. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. यानंतर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला. होळी सणाच्या नंतर केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला.

आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली. महत्त्वाची बाब अशी की गेल्या 78 महिन्यांमध्ये केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच दोन टक्के इतकी कमी DA वाढ लागू केली.

यामुळे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी सुद्धा पाहायला मिळाली. जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात वाढला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी असतानाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. मार्च महिन्यात आणि साधारणतः ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो, पण मार्च महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि ऑक्टोबर महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून लागू होत असतो.

दरम्यान मार्च महिन्यापासून ची महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर आता जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढू शकतो याबाबत नवीन अपडेट हाती आली आहे.

किती वाढणार महागाई भत्ता?

खरे तर जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील ग्राहक मंत्रालयाच्या एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार शनिवारी 2025 पासून चा महागाई भत्ता निश्चित झाला. आता जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधी मधील या आयसीपीआयच्या निर्देशांकानुसार जुलै 2025 पासून चा महागाई भत्ता निश्चित होणार आहे.

हा महागाई भत्ता जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. दरम्यान एआयसीपीआयच्या आत्तापर्यंतच्या तीन महिन्यांच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी सुद्धा महागाई भत्ता फारच कमी वाढेल असे चित्र दिसत आहे.

2025 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महागाईचे दर कमी झालेले आहेत आणि यामुळेच यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीसारखा तीन – चार टक्क्यांनी वाढणार नाही हे फिक्स आहे. कदाचित जुलै महिन्यापासून सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून जसा दोन टक्क्यांनी वाढला तेवढाच वाढू शकतो.

परंतु यासाठी सर्व सहा महिन्यांची आकडेवारी आपल्या हातात असणे आवश्यक आहे. यामुळे आता पुढील तीन महिने एआयसीपीआयची आकडेवारी कशी राहते यावरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचे गणित अवलंबून राहणार आहे.

एआयसीपीआयची सध्याची आकडेवारी कशी आहे?

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, AICPI-IW हा असा निर्देशांक आहे ज्याच्या आधारावर महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. दरम्यान, कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत, कामगार ब्युरोने गेल्या महिन्याच्या आकडेवारीच्या आधारे अहवाल दिला की, AICPI-IW फेब्रुवारी 2025 मध्ये 0.4 अंकांनी घसरून 142.8 वर आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जानेवारी 2025 मध्ये हा निर्देशांक 143.2 होता.

खरेतर, वर्ष-दर-वर्ष चलनवाढ फेब्रुवारी 2025 मध्ये 2.59% पर्यंत खाली आली, जी फेब्रुवारी 2024 मध्ये 4.90% होती. दरम्यान देशातील एकूण चलनवाढीची परिस्थिती पाहता आता मार्च आणि एप्रिलमध्ये AICPI-IW आणखी घसरण्याची अपेक्षा आहे. साहजिकच हे निर्देशांक घसरले की याचा फटका सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीवर सुद्धा पाहायला मिळणार आहे.

वास्तविक, ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI वर आधारित किरकोळ महागाई या वर्षी मार्चमध्ये 3.34% होती जो की गेल्या पाच वर्षांचा नीचांक आहे. एकंदरीत पुढील काही महिने हे एआयसीपीआयचे निर्देशांक असेच दबावात राहण्याची शक्यता असून यावेळी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा फारच कमी प्रमाणात वाढणार असे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe