प्लॉट खरेदीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत ? अगोदर वाचा याचे फायदे आणि तोटे

रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात. रियल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही व्यक्ती घर किंवा फ्लॅट विकत घेतात किंवा काही प्लॉट विकत घेतात.

Updated on -

सध्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये बहुतांशी गुंतवणूकदार हे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. रियल इस्टेट क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतात. रियल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर काही व्यक्ती घर किंवा फ्लॅट विकत घेतात किंवा काही प्लॉट विकत घेतात.

तसेच यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीचे प्रमाण देखील वेगवेगळे असलेले बघायला मिळते. समजा तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर तो फ्लॅटपेक्षा अगदी दहा टक्के किमतीत देखील मिळू शकतो.

अशाप्रकारे तुम्हाला देखील जर प्लॉट घ्यायचा असेल तर त्या अगोदर प्लॉटमधील गुंतवणूक केल्याने फायदे कोणते होतात आणि तोटे काय होतात हे देखील आपल्याला माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. याचीच माहिती आपण या लेखात बघू.

 प्लॉटमध्ये गुंतवणूक केली तर हे होतात फायदे

1- सध्या आपल्याला माहित आहे की जमिन ही मर्यादित असल्याने व ती वाढवता येत नसल्यामुळे ती एक खूप मौल्यवान अशी मालमत्ता ठरते. कारण जमिनीची नव्याने निर्मिती करता येणे शक्य नसल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या जागांना खूप मोठ्या प्रमाणावर कालांतराने मागणी वाढू शकते

व त्यामुळे किंमतीत देखील वाढ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्लॉटमधील गुंतवणुकीतून कालांतराने त्या माध्यमातून चांगली किंमत आपल्याला मिळू शकते.

2- ज्या ठिकाणी आपण प्लॉट खरेदी केला असेल व अशा ठिकाणी जर एखादा मोठा प्रकल्प सुरू होत असेल तर बाजूच्या जमिनीच्या किमतींना देखील चांगली मागणी वाढून दर प्रचंड प्रमाणामध्ये वाढतात.

3- तसेच प्लॉट खरेदी केल्यानंतर त्या प्लॉटचा ताबा मिळवण्यासाठी आपल्याला थांबून राहावे लागत नाही. एकदा व्यवहार पूर्ण केल्यानंतर महत्वाची असलेली कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली की लगेच आपल्याला प्लॉट ताब्यात मिळतो.

4- जेव्हा आपण फ्लॅट खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या फ्लॅटचा मेंटेनन्स खर्चाचा देखील विचार करावा लागतो. परंतु त्या तुलनेत मात्र जर प्लॉट खरेदी केला तर याचा मेंटेनन्स चार्ज म्हणजेच देखभाल खर्चाचा कुठलाच प्रश्न नसतो.

5- समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कर्ज काढायचे नाही व फ्लॅट घ्यायचा असेल तर ते जवळपास अशक्य असते. परंतु याउलट तुम्हाला एखाद्या गुंठाचा भूखंड कर्ज न काढता देखील तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या पैशांमध्ये खरेदी करू शकतात.यामागील महत्वाचे कारण म्हणजे फ्लॅटच्या एकूण किमतीच्या दहा टक्के रक्कमेत तुम्ही प्लॉट खरेदी करू शकतात.

 प्लॉटमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे

1- जर आपण एखाद्या फ्लॅटमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात वाढलेल्या किमतीमध्ये आपण विक्री करून नफा मिळवू शकतो किंवा फ्लॅट भाड्याने देऊन देखील आपण नियमित उत्पन्न मिळू शकतो. परंतु प्लॉटमधील गुंतवणुकीतून अशा प्रकारचे उत्पन्न मिळवता येत नाही.

2- तसेच तुम्हाला जर एखाद्या वेळेस आपत्कालीन पैशांची गरज भासली तर तुम्ही प्लॉटमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला गरज असेल तेव्हा मोकळी करून पैसे उभे करू शकत नाही.

3- तसेच प्लॉटमध्ये गुंतवणूक कर्ज घेऊन जर तुम्हाला करायचे असेल तर मात्र हे कठीण जाऊ शकते. कारण बँका तुम्ही भूखंड घेतला आणि त्यावर मालमत्ता बांधायची तुमचा प्लान असेल तरच तुम्हाला कर्ज द्यायला उत्सुक असतात. तुम्हाला फक्त प्लॉट घेण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर मात्र बँका सहजासहजी कर्ज देत नाहीत.

4- तसेच बरेच जण प्लॉटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असताना त्या माध्यमातून आपल्याला कर सवलत किंवा कर बचत मिळू शकेल असा विचार करत असतात. परंतु जमिनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर कराचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही.

5- बऱ्याचदा अशा घेतलेल्या प्लॉटवर अतिक्रमण होऊ शकते किंवा त्याबाबत कायदेशीर समस्या निर्माण होऊन त्यामध्ये आपल्याला पैसा खर्च करावा लागू शकतो.

6- बऱ्याचदा काही प्रकल्पांसाठी सरकारच्या माध्यमातून सक्तीने जमीन अधिग्रहित केली जाते व त्याचा मोबदला जमीन मालकाला मिळत असतो. परंतु अशा प्रकारचा अपेक्षित मोबदला तुम्हाला लवकर मिळेल याची काहीच खात्री घेता येत नाही.

7- तसेच गुंतवणूक करताना संबंधित प्लॉट एनए नसेल तर तो करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. इतकेच नाही तर तलाठी आणि तहसील कार्यालयात देखील हेलपाटे मारावे लागतात.

यामुळे जमिनीतील गुंतवणुकीचे लाभ तसेच तोटे देखील आहेत. याशिवाय तुम्ही खरेदी करत असलेला प्लॉट कोणत्या ठिकाणी आहे किंवा भविष्यातील आपल्या आर्थिक गरजा काय आहेत? गुंतवणुकीचा निर्णय घेणे फायद्याचे ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News